12 December 2024 7:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

कागमार-गरीबांसाठी १ लाख ७० हजार कोटींचं पॅकेज; अर्थमंत्र्यांची घोषणा

Corona Crisis, Nirmala Sitharaman, Covid 19, Lock Down

नवी दिल्ली, २६ मार्च: देशव्यापी लॉकडाऊनचा आज दुसरा दिवस असून देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची सख्या वाढत असल्याचे दिसत आहे. देशभरात आतापर्यंत ६०६ जणांना करोना विषाणूची लागण झाली आहे, तर या आजारात ११ जणांचा बळी गेला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्रात १२२ इतकी आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. देशात हातावर पोट असणाऱ्यांचे मोठे हाल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांना गोरगरीब जनता, कामगारांसाठी १ लाख ७० हजार कोटी जाहीर केले आहेत.

कोरोना व्हायरसमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी मोदी सरकारने तब्बल १.७ लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन पॅकेज दिले आहे. या योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय, अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांनी शिक्कामोर्तब केले. हा निधी तब्बल १० कोटी लोकांच्या थेट बँक खात्यात वळविला जाणार आहे. तसेच लॉकडाऊनमुळे परिणाम झालेल्या व्यवसायांना मदत करण्यासाठी वापरला जाईल.

 

News English Summery: Today is the second day of a nationwide lock down, and the number of coronary infections is increasing across the country. So far 606 people have been infected with Corona virus across the country, while 11 have died of the disease. Maharashtra has the highest number of patients in the country with 122. Meanwhile, Prime Minister Narendra Modi has announced a 21-day lockdown across the country to prevent the outbreak of the Corona virus. This is going to have a big impact on the economy of the country. Nirmala Sitharaman, Finance Minister of the country has made a big announcement under the Prime Minister Garib Kalyan Yojana. There are going to be major problems in the country with stomachs on hand. Against this backdrop, they have declared Rs.1,70,000 crores for the poor people and workers.

 

News English Title:  Story Finance Minister Nirmala Sitharaman on Corona virus outbreak in India announcing an economic package to deal with the Covid 19 impact Lock Down News latest Updates.

हॅशटॅग्स

#Nirmala Sitharaman(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x