Uber Cab कडून ३७०० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याची घोषणा

मुंबई, ७ मे : कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनचा अनेक कंपन्यांवर फरक पडत आहे. नुकतीच अमेरिका आणि जगातील सर्वात मोठी जिम कंपनी Gold Gym ने या काळात आपलं दिवाळ निघाल्याच घोषित केलं. यानंतर आता जगातील सर्वात मोठी कॅब सर्व्हिस कंपनी उबर (Uber)वर देखील संकट कोसळलं आहे. कंपनीने जाहिर केलं आहे की, आर्थिक संकटामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढावं लागेल.
अॅप आधारित कॅब सर्व्हिस पुरवणाऱ्या Uber ने ३,७०० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याची घोषणा केली आहे. युएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमीशनमध्ये (एसईसी) कंपनीकडून याबाबत माहिती देण्यात आली. “करोना व्हायरस महामारीमुळे निर्माण झालेलं आर्थिक संकट आणि व्यवसायावर झालेला परिणाम, यामुळे कंपनीने खर्च कमी करण्याची योजना आखली आहे.
यानुसार, कस्टमर सपोर्ट आणि रिक्रुटर्स टीममध्ये कपात केली जात आहे. एकूण ३ हजार ७०० फुल-टाइम कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केलं जाईल ” , असं कंपनीकडून सांगण्यात आलं. भविष्यात अजून कपात करावी लागू शकते असे संकेतही कंपनीने दिलेत.
दरम्यान, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई)ने ३ मे अखेरच्या आठवड्यापर्यंतची माहिती विचारात घेऊन हा अहवाल तयार केला आहे. देशात लॉकडाउन सुरू झाले, त्यावेळी बेरोजगारीचे प्रमाण ७ टक्क्यांपर्यंत होते. लॉकडाउनच्या काळामध्ये बेरोजगारी वाढली आहे. सध्या भारतातील बेरोजगारीचे प्रमाण २७.११ टक्के झाले आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामधील बेरोजगारी ही अधिक असल्याचे या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारीचे प्रमाण २६.६९ टक्के, तर शहरी भागात २९.२२ टक्के आहे. लॉकडाउननंतर महानगरामधील उद्योगधंदे बंद झाल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे अनेक स्थलांतरित हे पुन्हा आपल्या मूळगावाला परतले आहेत.
News English Summary: Corona virus and lockdown are making a difference to many companies. Gold Gym, the largest gym company in the US and the world, recently announced its bankruptcy during this period. After this, the world’s largest cab service company Uber is also in crisis. The company has announced that it will have to lay off many employees due to the financial crisis.
News English Title: Story Uber is laying off 3700 as rides plummet due to Covid 19 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Servotech Power Systems Share Price | सर्वोटेक पॉवर सिस्टम्स शेअरने 5 दिवसात 21% परतावा आणि 6 महिन्यात 209% परतावा दिला
-
Kaynes Technology India Share Price | मल्टिबॅगर शेअर! फक्त 1 दिवसात 19 टक्के परतावा, शेअर अजून तेजीत येणार, नेमकं कारण काय?
-
Brightcom Group Share Price | स्वतः झालेला ब्राइटकॉम ग्रुप शेअर पुन्हा तुफान तेजीत, मागील 13 दिवसांत 70 टक्के परतावा, खरेदी करणार?
-
Adani Vs Hindenburg Report | हिंडेनबर्ग वाद, सेबीच्या नियमांमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत, तज्ज्ञांच्या समितीकडून अदानी समूहाला क्लीन चिट
-
2000 Notes Exchanged | 30 सप्टेंबरपर्यंत 2 हजार रुपयांच्या नोटा बदलता न आल्यास काय कायदेशीर कारवाई होणार? हे लक्षात ठेवा
-
RBI To Modi Govt | लोकसभा निवडणुकीपूर्वी RBI कडून मोदी सरकारला मोठं गिफ्ट, 87,416 कोटी रुपयांचा लाभांश देण्यास मान्यता
-
Repro India Share Price | एका आठवड्यात 'रेप्रो इंडिया' कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 48 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स पहा
-
Swaraj Suiting Share Price | होय! फक्त 32 रुपयाचा शेअर, मागील एका आठवड्यात गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
-
Abbott India Share Price | 'ऍबॉट इंडिया'च्या गुंतवणुकदारांना मिळणार बंपर लाभांश, होणार मजबूत फायदा
-
Cressanda Solutions Share Price | 'क्रेसेंडा सोल्यूशन्स' शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले, अल्पावधीत दिला 14000% परतावा, डिटेल्स पहा