12 December 2024 9:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

केंद्राने निर्णय बदलला; ई-कॉमर्स कंपन्यांकडून फक्त जीवनावश्यक वस्तुंचीच विक्री

Corona Crisis, Covid 19, E Commerce, Lockdown

नवी दिल्ली, १९ एप्रिल: केंद्र सरकारकडून रविवारी ई-कॉमर्स कंपन्यांना लॉकडाऊनच्या नियमांतून देण्यात आलेली सूट मागे घेण्यात आली. यापूर्वी १५ एप्रिलला केंद्र सरकारकडून ई-कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक गोष्टींशिवाय इतर वस्तूंच्याही घरपोच डिलिव्हरीला परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे कोरोनाचे कन्टेन्मेंट झोन वगळून इतर ठिकाणी वस्तू घरपोच करण्याचा ई-कॉमर्स कंपन्यांचा मार्ग मोकळा झाला होता. त्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांकडून जोरदार तयारीही करण्यात आली होती.

मात्र केंद्र सरकारने लॉकडाऊन काळात ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून बिगर जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला स्थगिती दिली आहे. चार दिवसांपूर्वी ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून मोबाइल फोन, रेफ्रिजरेटर आणि रेडिमेड कपड्यांच्या विक्रीला परवानगी दिली होती. परंतु, आता ही सूट मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर केवळ जीवनावश्यक वस्तूच मिळतील. राष्ट्रव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत चालणार आहे.

केंद्र सरकारने सूट दिलेल्या कामांत आयुषसह आरोग्य सेवा, कृषी, मत्स्य व्यवसाय (समुद्रात आणि आंतर्देशीय), जास्तीत जास्त 50 टक्के कामगारांसह वृक्षारोपणाची कामे (चहा, कॉफी आणि रबर), पशुपालन, मनरेगांतर्गत कामे, मात्र, यात सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन आणि मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल. तसेच वीज, पाणी आणि गॅस या आवश्यक सेवांचा समावेश आहे.

 

News English Summary: The central government has stopped the sale of non-essential goods through e-commerce companies during lockdown. Four days ago, the sale of mobile phones, refrigerators and readymade garments was allowed through e-commerce companies. However, the suit has now been revoked. Therefore, now only the essentials are available on the online platform. The nationwide lockdown will run until May 7.

News English Title: Story union home ministry has changed the decision regarding supply of non essential items by e commerce companies during lockdown News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x