मुंबई : शेअर बाजारानं आज नवा उच्चांक गाठला आहे आणि बहुसंख्य बँकांच्या शेअर्सचं मूल्य वधारल्यानं बाजारात ही तेजी पाहायला मिळत आहे. आज मुंबई शेअर बाजाराने पहिल्यांदा ३८,००० अंशांचा टप्पा ओलांडला.

तर दुसरीकडे निफ्टीने सुद्धा ११,५०० अशांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे सेन्सेक्स व निफ्टी यांनी पहिल्यांदाच हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. यात बँकिंगसह जवळपास सर्वच कंपन्यांच्या शेअरच्या किमतीत चांगली वाढ झाली आहे.

उसळी घेतलेल्या शेअर्स’मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या शेअरच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानं शेअर बाजारात तेजी पाहायला मिळते आहे. तसेच एसबीआय, आयटीसी, ऍक्सिस बँकेच्या शेअर्सचे दरही चांगलेच वधारले आहेत. त्यात एचपीसीएल, बीपीसीएल, हिंदाल्को, वेदांता यांचीही कामगिरी चांगली झाली आहे. परंतु असं असलं तरी आज लुपिन, डॉ. रेड्डीज लॅब, टायटन, अशोक लेलँड, एनएमडीसीच्या शेअरचं मूल्य मात्र घसरलं आहे.

Today sensex breaks all past records of hike