मोदीच देशाला महासत्ता करतील सांगणारे भारतीय अब्जाधीश संकटात | 73 रुपयांना विकली कंपनी

अबुधाबी, १८ डिसेंबर: युएईमधील भारतीय वंशाचे अब्जाधीश बी.आर शेट्टी हे आपला फिनाब्लर पीएलसी (BR Shetty Finablr Plc) चा व्यवसाय इस्त्रायली-युएई मधील कंपनीला फक्त 1 डॉलर (73.52 रुपये) मध्ये विकत आहेत. बीआर शेट्टी मागील वर्षापासून आर्थिक संकटात आले होते. त्यांच्यावर मोठं कर्ज आहे. तसेच त्यांच्या विरोधात फसवणुकीची चौकशी देखील सुरु आहे. आज त्यांच्या बिझनेसची मार्केट वॅल्यू फक्त 1.5 बिलियन पाउंड ($2 बिलियन) राहिली आहे.
बीआर शेट्टी यांच्या फायनेंशियल सर्विस कंपनी फिनाब्लरने घोषणा केली आहे की, ग्लोबल फिनटेक इन्वेस्टमेंट्स होल्डिंग (Global Fintech Investments Holding) सोबत ते करार करत आहेत. GFIH इस्राईलच्या प्रिज्म ग्रुप (Prism Group of Company) ची सहकारी कंपनी आहे. ज्यांना Finablr Plc Limited संपूर्ण संपत्ती विकत आहे. इस्राईलचे माजी पंतप्रधान एहुद ओलमर्ट (Ehud Olmert) यांच्याशी संबंधित असलेल्या प्रिज्म ग्रुपने या बाबत व्यवहार करण्यासाठी अबुधाबीच्या रॉयल स्ट्रेटेजिक पार्टनर्स (Royal Strategic Partners) सोबत एक कमिटी स्थापन केली आहे.
मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये फिनाब्लरची मार्केट वॅल्यू $ 2 बिलियन इतकी होती. एप्रिलमध्ये त्यांच्यावर $1 बिलियनपेक्षा अधिकचं कर्ज होतं. Finablr Plc शिवाय शेट्टी यांची अबुधाबी येथील कंपनी एनएमसी हेल्थचे शेअर डिसेंबरमध्ये 70 टक्क्यापेक्षा खाली गेले आहे. भारतीय मुळचे अरबपती शेट्टी यांच्या कंपन्यांविरोधात फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. ज्यामुळे मागच्या वर्षीच कंपनीच्या शेअरवर स्टॉक एक्सचेंजमध्ये खरेदी-विक्रीस बंदी घालण्यात आली होती.
यूएईमध्ये हेल्थकेयर इंडस्ट्रीच्या माध्यमातून करोडोंची संपत्ती कमवणारे 77 वर्षाचे शेट्टी पहिले भारतीय आहे. त्यांनी 1970 मध्ये एनएमसी हेल्थची सुरुवात केली होती. त्यानंतर 2012 मध्ये लंडन स्टॉक एक्सचेंजवर ती लिस्ट झाली. 70 च्या दशकात शेट्टी फक्त आठ डॉलर घेऊन यूएईला आले होते. मेडिकल रिप्रेजेंटेटिव म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली होती.
बीआर शेट्टी यांनी 1980 मध्ये अमीरातमध्ये सर्वात जुनी रेमिटेंस बिझनेस यूएई एक्सचेंजची सुरुवात केली. यूएई एक्सचेंज, यूकेची एक्सचेंज कंपनी ट्रॅवलेक्स सह छोट्या-छोट्या पेमेंट सोल्यूशंस प्रोवाईडर्स आणि शेट्टींची फिनब्लर सोबत 2018 मध्ये सार्वजनिक झाली होती. शेट्टी यांनी हेल्थकेयर आणि फायनॅनशल सर्विसेजसह हॉस्पिटेलिटी, फूड अँड बेवरेज, फार्मास्यूटिकल मॅन्युफॅक्चरिंग तसेच रिअल इस्टेटमध्ये देखील त्यांनी व्यवसाय केला.
भारतीय जनता पक्ष आणि RSS सोबत अत्यंत जवळचे संबंध होते (येथे वाचू शकता). कालांतराने उद्योग कर्जात आणि भ्रष्टाचारात गुरपटला आणि अत्यंत बिकट आर्थिक स्थिती ओढवली. विशेष म्हणजे दुबईतील एका मुलाखतीत त्यांनी काश्मीरमध्ये फिल्मसिटी उभी करायची असून त्यासाठी ३००० एकर जागा खरेदी करणार असल्याचं म्हटलं होतं (येथे वाचू शकता). तसेच पंतप्रधान नरेन्द्र मोदींच्या नैत्रुत्वात भारत देश महासत्ता बनेल असं देखील त्यांनी ठणकावून सांगितलं होतं (सदर लेख येथे आहे).
News English Summary: BR Shetty, a billionaire of Indian descent in the UAE, is selling his Finablr Plc business to an Israeli-UAE company for just डॉलर 1 (Rs 73.52). BR Shetty had been in financial crisis since last year. They have a huge debt. An investigation into the fraud against them is also underway. Today, the market value of their business is only बिल 1.5 billion ($ 2 billion).
News English Title: UAE based Indian billionaire B R Shetty company sold for 1 dollar news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL