सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी संजय लीला भन्साळींची मुंबई पोलिसांकडून चौकशी
मुंबई, ६ जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. सुशांतने १४ जून रोजी आत्महत्या केली. त्यानंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून सुशांतने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणी कलाविश्वातील अनेक दिग्गजांवर घराणेशाहीचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळेच सध्या पोलीस यंत्रणा या प्रकरणी कसून चौकशी करत आहे.
सुशांत सिंग राजपूत (३४) याच्या आत्महत्येप्रकरणी अनेक बड्या हस्तीची चौकशी पोलीस करत आहेत. त्यांच्या दबावातून संजय लीला भन्साळीच्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटातून सुशांतला रिप्लेस करत त्याजागी रणवीर सिंगला लीड रोल देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानुसार याप्रकरणी चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्याकडे पोलीस चौकशी करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
Mumbai: Director & Producer Sanjay Leela Bhansali arrives at Bandra police station to record his statement in connection with actor Sushant Singh Rajput’s suicide case. pic.twitter.com/UKDKEZ28nc
— ANI (@ANI) July 6, 2020
रामलीला चित्रपटातून सुशांतला काढण्यासाठी चित्रपट निर्मात्यावर कोणी दबाव टाकला होता का याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. रामलीला आणि बाजीराव मस्तानी हे चित्रपट सुशांतला मिळणार होते. मात्र, त्याआधी सुशांतचे यशराज फिल्म्ससोबत करार झाल्याने त्याला त्या चित्रपटात काम करता आले नाही. परिणामी त्याच्यातील नात्यात कटुता आली होती. त्यामुळे यातील तथ्य जाणुन घेण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करत आहेत. त्यानुसार अद्याप ३० जणांचे जबाब पोलिसांनी नोंदविले असून याप्रकरणी अनेकांना समन्स पाठविण्यात आले आहेत. ज्यात भन्साळी यांचाही समावेश असल्याचे समजते. मात्र, याबाबत पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे किंवा वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निखिल कापसे यांच्याकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या दोन चित्रपटांसाठी सुशांतला साइन केलं होतं. मात्र ऐनवेळी त्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. म्हणून सुशांत नैराश्यात गेला असं म्हटलं जात आहे. त्यामुळेच या प्रकरणी संजय लीला भन्साळी यांची चौकशी करण्यात येणार आहे.
News English Summary: Director Sanjay Leela Bhansali has appeared at the Bandra police station for questioning in the suicide case of actor Sushant Singh Rajput. Sushant committed suicide on June 14. Since then, there has been only one sensation in the art world.
News English Title: Bollywood actor Sushant Singh Rajput Case Filmmaker Sanjay Leela Bhansali Bandra Police Station Suicide Investigation News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News