8 December 2021 5:37 PM
अँप डाउनलोड

बॉलीवूड अभिनेत्री आणि हवा-हवाई गर्ल श्रीदेवी यांच हृदयविकाराने निधन.

दुबई : प्रख्यात बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झालं. सर्वांच्या लाडक्या हवा-हवाई गर्ल चं वय ५४ वर्ष होतं. त्यांचा आकस्मित झालेल्या मृत्यूची बातमी खरी असून त्यांना स्वतः त्यांच्याच कुटुंबातील व्यक्ती संजय कपूर यांनी ही दुजोरा दिला आहे.

त्या दुबईत त्यांच्या कुटुंबियांसोबत एका लग्न समारंभासाठी गेल्या होत्या आणि उशिरा रात्री हृदयविकाराने त्यांचं दुःखद निधन झालं. संपूर्ण बॉलिवूड मध्ये त्या एक उत्तम अभिनेत्री म्हणूल प्रसिध्द होत्या. सर्वप्रथम १९७८ साली त्यांनी सोलहवाँ सावन या सिनेमामधून पदार्पण केला होत.

चालबाज, निगाहें, सदमा, मिस्टर इंडिया, जुदाई, लम्हे हे त्यांचे काही प्रसिध्द चित्रपट. काही वर्षांपूर्वी म्हणजे २०१२ मध्ये त्यांनी इंग्लिश विंगलिश या सिनेमातून मराठी व्यक्तिमत्व साकारलं होतं आणि चित्रपट खूप प्रसिध्द झाला होता. त्या मूळच्या तामिळनाडूच्या होत्या आणि वयाच्या केवळ १३ व्या वर्षीच त्यांनी बालकलाकार म्हणून सिनेश्रुष्टीत पदार्पण केलं होतं.

श्रीदेवी यांनी आत्तापर्यंत २०० सिनेमात काम केलं आहे. दिग्दर्शक बोनी कपूर हे त्यांचे पती असून, त्यांची मुलगी जान्हवी ही ‘धडक’ या सिनेमातून बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण बॉलिवूड मध्ये दुःख व्यक्त केल जात आहे.

हॅशटॅग्स

#Sridevi Passed Away(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x