Brahmastra Third Day Collection | काही वेळापासून असे पहायला मिळत आहे की, सर्व चित्रपट बॉयकॉट होत आहेत मात्र निकताच रिलीज झालेला आलिया आणि रणबीर कपूरचा चित्रपट बॉयकॉट लिस्टमध्ये झळकला नाही मात्र ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीजच्या पहिल्याच रात्री ऑनलाईन लीक झाला. आता याचा परिणाम या बीग बजेट चित्रपटावर होताना दिसत आहे. 9 सप्टेंबर रोजी रिलीज झालेला चित्रपट बॉयकॉटच्या वादळातून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

कमाईची चिंता निर्मात्यांना सतावताना
दरम्यान, या बॉयकॉटच्या वादळात ब्रह्मास्त्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. मात्र या आधी निर्मात्यांना हिच चिंता सतावत होती. बॉयकॉटच्या वादळातून वाचलेला ब्रह्मास्त्र चित्रपट कमाई कशी करेल? पहिल्या दिवशी चित्रपटाची आगाऊ तिकीट विकले गेल्याने थोडी चिंता तिथे मिटली. चित्रपटाने पहिल्याच दिवशी 36 कोटींचा आकडा पार केला.

ब्रह्मास्त्र साठी सकारात्मक संकेत
अयान मुखर्जी दिग्दर्शित चित्रपट ब्रह्मास्त्रने पहिल्याच दिवशी 36 कोटींचा गल्ला जमवला तर दुसऱ्या दिवशी 41.50 कोटींचा आकडा पार केला. दरम्यान, या चित्रपटाने दोन भाषांमध्ये 77 कोटींच्यावर कमाईकेली. आणि दुसऱ्याच दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली.

रविवार ब्रह्मास्त्रसाठी ठरला खास
चित्रपट रिलीज होऊन 3 दिवस झाले आहेत. ब्रह्मास्त्र चित्रपटाला रविवार पावला म्हणयला हरकत नाही. 3 दिवसांच्या कलेक्शनच्या मानानी रविवारी याचित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार केला. दरम्यान, रविवारी चित्रपटाची 7 लाख 40 हजारांहून अधिक तिकिटांची आगाऊ विक्री झाली.

Box Office

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Brahmastra Third Day Collection Checks details 12 September 2022.

Brahmastra Collection | बॉयकॉटच्या वादळात ‘ब्रह्मास्त्र’ निखरला, तिसऱ्या दिवशी 100 कोटींच्या पुढे कलेक्शन