11 December 2024 6:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Salman Khan | बहिणीच्या घरी येतानाचा सलमानचा एक व्हिडिओ व्हायरल, पटकन काढला डोळ्यांवरचा 'तो' चष्मा - Marathi News

Salman Khan

Salman Khan | बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या बहिण अर्पिताच्या घरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन झालं होतं. दरम्यान एक दिवसाआधी अर्पिताच्या घरच्या बाप्पांचं विसर्जन होतं. तेव्हा भाऊ सलमान यांनी देखील हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. एवढंच नाही तर ढोल ताशांच्या धुमधडाक्यांवर ताल धरत डान्स देखील केला. संपूर्ण वातावरण अतिशय मंगलमय आणि प्रसन्न झालं होतं. अर्पिताच्या पतीने आणि घरातील सदस्यांनी बाप्पाचा विसर्जन केलं. परंतु नेटकऱ्यांनी सलमानच्या त्या चष्म्याला प्रचंड वायरल केलं.

बहिण अर्पिताच्या घरी येताना सलमान गाडीमधून आले. गाडीमध्ये बसलेले असताना पहिली नजर सलमान यांच्या चेहऱ्यावर पडत होती. कारण की, सलमान यांनी चक्क जवळच दिसण्याचा चष्मा डोळ्यांना लावला होता. कदाचित ते गाडीमध्ये फोन पाहत असतील किंवा एखादं पुस्तक वाचत असतील. परंतु सलमानच्या या चष्म्यामुळे अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, सलमान खान आता म्हातारे झालेत का? त्यांना दिसायला कमी येऊ लागलं आहे का?. सलमानचा व्हिडिओ पाहून अनेकांनी असे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

सलमान यांनी पापाराजी यांना पाहताच अगदी घाई गडबडीमध्ये चष्मा डोळ्यांवरून काढला. सलमान यांनी आत्तापर्यंत शूटिंग दरम्यान किंवा सोशल मीडियावर फोटोज पोस्ट करण्यासाठी अनेकदा गॉगल्स आणि स्टायलिश चष्मे लावले आहेत. परंतु एवढ्या दिवसांतून पहिल्यांदाच सलमानच्या डोळ्यांवर अशा पद्धतीचा वेगळा चष्मा पाहायला मिळाला.

सलमान यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यांचे रोमान्स, ॲक्शन आणि फायटिंगचे पिक्चर पहायला अनेकांना आवडते. सलमानच्या चित्रपटांची विशेष गोष्ट म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्ती सलमानच्या चित्रपटांचे चाहते आहेत. सलमानचे बरेच असे सिनेमे कौटुंबिक आहेत. त्याचबरोबर देशभक्तीवर देखील सलमानचे चित्रपट आहेत. त्यामुळे आपला भाईजान पुन्हा कोणत्या नवीन चित्रपटामध्ये दिसणार याची आतुरता चहात्यांना लागली आहे.

Latest Marathi News | Salman Khan photos in glasses are going viral on social media 10 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Salman Khan(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x