27 July 2024 2:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो! जनरल कोट्यातून लोअर बर्थ सीट मिळवता येईल, माहित असणं गरजेचं आहे EPF Pension Money | 90% पगारदारांना माहित नाही, EPFO कडून 7 प्रकारच्या पेन्शन मिळतात, फायद्याची अपडेट Lakshmi Narayan Rajyog | लक्ष्मी-नारायण योग 'या' 3 राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ, आर्थिक नशीब उजळवणार FD Investment Money | 1 वर्षाच्या रु.1,50,000 FD वर कोण अधिक रक्कम देईल? SBI, पोस्ट ऑफिस, HDFC की ICICI? Gold Rate Today | खुशखबर! सोनं खरेदीची योग्य वेळ, आज सोनं 5149 रुपयांनी स्वस्त झालं, भाव धडाम झाले Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका
x

Sameer Wankhede | समीर वानखेडे यांच्याविरोधात 25 कोटींच्या लाचप्रकरणी ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल

Sameer Wankhede

Sameer Wankhede | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनयाला अडकवून त्याच्या सुटकेच्या बदल्यात २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. अधिकृत सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली.

अभिनेता शाहरुख खानच्या मुलाची निर्दोष मुक्तता करण्यासाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरची दखल घेत ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे. एनसीबीच्या काही माजी अधिकाऱ्यांनाही समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय एजन्सीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) गुन्हा दाखल केला आहे.

सीमा शुल्क आणि अप्रत्यक्ष कर संवर्गातील २००८ च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेचे अधिकारी वानखेडे यांनी ईडीच्या कोणत्याही दंडात्मक कारवाईपासून संरक्षण मिळावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. क्रूझवर सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानयाच्याविरोधात आरोप निश्चित न करण्याच्या बदल्यात २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने वानखेडे यांच्याविरोधात गेल्या वर्षी मे महिन्यात गुन्हा दाखल केला होता.

2 ऑक्टोबर 2021 रोजी आर्यन खानला कॉर्डेलिया क्रूझ जहाजातून अंमली पदार्थ घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. सीबीआयने वानखेडे आणि इतरांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 120-बी (गुन्हेगारी कट रचणे) आणि 388 (खंडणीसाठी धमकावणे) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत लाचखोरीच्या तरतुदींनुसार धमकावल्याचा गुन्हा दाखल केला होता.

वर्षभरानंतर एनसीबीने क्रूझवर ड्रग्ज सापडल्याप्रकरणी १४ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले, पण आर्यन खानला ‘क्लीन चिट’ देण्यात आली. २०२१ मध्ये एका ‘स्वतंत्र साक्षीदारा’ने आरोप केला होता की, आर्यन खानची सुटका करण्यासाठी एनसीबीचे अधिकारी आणि साक्षीदार किरण गोसावी यांच्यासह इतरांनी २५ कोटी रुपयांची मागणी केली होती.

त्यानंतर एनसीबीने समीर वानखेडे आणि इतरांविरोधात अंतर्गत दक्षता चौकशी केली आणि ही माहिती सीबीआयला दिली, त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

News Title : Sameer Wankhede ED files money laundering case against accused in rupees 25 crore bribery case.

हॅशटॅग्स

#Sameer Wankhede(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x