29 March 2024 1:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला
x

राज्य सरकार पलटलं, मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी कायम

मुंबई : नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात निवेदन देऊन मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी असल्याचं मान्य करणारऱ्या राज्य सरकारने काही दिवसातच सुरक्षेच कारण पुढे करत स्वतःचाच निर्णय फिरवला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून विधिमंडळात दिली जाणाऱ्या निवेदनांवर सामान्यांनी किती विश्वास करावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्याच्या पोलीस महासंचालकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यात एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे सिनेमागृहात खाद्यपदार्थ चढ्या दारात विकल्याबद्दल कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस ऍक्टमध्ये रडतूड नसल्याचं कारण पुढे केलं आहे.

उच्च न्यायालयाने आधीच या विषयावर सरकारची खरडपट्टी काढलेली असताना सरकारचा हा निर्णय म्हणजे केवळ एक पळवाट असल्याचं अनेक जण बोलत आहेत. त्यामुळे मल्टिप्लेक्स मालकांचा उन्मत्तपणा आणि सामान्यांची लूट वाढण्याची शक्यता आहे. मनसेच्या आक्रमक आंदोलनामुळे सरकारवर चांगलाच दबाव निर्माण झाला होता. परंतु सरकार सुरक्षेचं कारण पुढे करत मल्टिप्लेक्स मालकांची पाठराखण तर करत नाही ना अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x