3 May 2025 12:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Beauty Skin Care Tips | फेशियल केल्यानंतर चुकून सुद्धा या गोष्टी करू नका, अन्यथा महागात पडेल

Beauty Skin Care Tips

Beauty Skin Care Tips | जगभरातील प्रत्येक स्त्री सुंदर दिसण्यासाठी आणि स्वतःच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काही ना काही करत असते. अशातच कडक उन्हाचे दिवस सुरू झाले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपली त्वचा जास्त प्रमाणात डल होऊ लागते. त्यामूळे बऱ्याच स्त्रिया पार्लरमध्ये किंवा लेडीज सलोनमध्ये जाऊन फेशियल ट्रीटमेंट घेत असतात. फेशियल ट्रीटमेंट घेतल्यानंतर चेहऱ्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेक स्त्रियांना या खास गोष्टींची माहिती नसल्याने त्यांची त्वचा खराब होऊ लागते. चला तर मग जाणून घेऊया फेशीयल ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्हाला कोणती काळजी घेणे गरजेचे आहे. (How do you maintain your skin after a facial?)

फेशियल ट्रीटमेंट – (What should I apply after facial treatment?)
चेहरा तेजस्वी व प्रोब्लेम फ्री बनविण्यासाठी फेशियल ट्रीटमेंट घेतली जाते. फेशियल ट्रीटमेंट या वेगवेगळया पद्धतीच्या असतात. पिंपल फेशियल, चॉकलेट फेशियल, पिगमेंटेशन फेशियल, अरोमा फेशियल अशा वेगवेगळ्या पद्धतीचे फेशियल अनेक स्त्रिया पार्लरमध्ये जाऊन करत असतात. ही फेशियल ट्रीटमेंट महिन्यातून एकदा केली जाते. जेणेकरून तुमची त्वचा कायम चमकत राहते आणि डल बनत नाही. एवढेच नाही तर, नियमित फेशियल केल्याने तुमची त्वचा तरुण आणि टवटवीत राहण्यास मदत होते.

उन्हापासुन बचाव – (What makes skin glow after facial?)
फेशियल केल्यानंतर उन्हामध्ये जाण्यापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. फेशियल करताना आपल्या चेहऱ्याच्या त्वचेवर विविध प्रकारच्या क्रीम आणि केमिकल्सचा प्रभाव पडलेला असतो. अशावेळी फेशियल केल्यानंतर तुमची त्वचा उन्हाच्या संपर्कात आल्याने डॅमेज होऊ शकते आणि यामुळे तुमचा चेहरा खराब दिसू शकतो.

चेहऱ्याला वारंवार हात लावणे – (How to maintain skin glow after facial)
फेशियल ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. चेहऱ्याला वारंवार हात लावू नये. आपल्या हातावर तसेच संपूर्ण शरीराच्या त्वचेवर अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव भ्रमण करत असतात. जेणेकरून आपल्याला इन्फेक्शन होऊ शकते. फेशियल केल्यानंतर चेहऱ्याची त्वचा अतिशय नाजूक आणि मुलायम बनलेली असते. त्यामुळे फेशियल केल्यानंतर चेहऱ्याला हात लावणे टाळले पाहिजे. जर तुम्ही चेहऱ्याला वारंवार हात लावत असाल तर तुम्हाला पिंपल्स येण्याची शक्यता वाढते.

मेकअप – (Can we apply anything after facial?)
फेशियल केल्यानंतर लगेचच मेकअप करणे टाळले पाहिजे. मेकअप प्रॉडक्टमध्ये भरपूर प्रमाणात केमिकल उपलब्ध असते. जे तुमच्या फेशियल केलेल्या त्वचेसाठी अत्यंत हानिकारक असते. जर तुम्हाला कोणत्या फंक्शनला जायचं असेल आणि त्यासाठी तुम्हाला मेकअप करायचा असेल तर तुम्ही तीन ते पाच दिवसांआधी फेशिअल ट्रीटमेंट घ्या. जेणेकरून त्याचा विपरीत परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होणार नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Beauty Skin Care Tips after facial check details on 08 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Beauty Skin Care Tips(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या