2 May 2025 5:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC
x

Home Made Pack for Pimples | चेहऱ्यावरील पिंपल करा दुर, 'या' सोप्या पद्धतीने चेहरा सुंदर करा, टिप्स फॉलो करा

Home Made Pack for Pimples

Home Made Pack for Pimples | चेहऱ्यावरील मुरुमांमुळे त्वचेमध्ये खोलवर परिणाम होतो, आणि चेहऱ्यावर डाग दिसून येतात. पिंपल्स चेहऱ्यावर फक्त वाईट दिसत नाहीत तर ते वेदना देखील देतात. तसेच मुरुमांची समस्या पौगंडावस्थेमध्ये उद्भवते आणि वाढत्या वयाबरोबर ती आणखी वाढू लागते. तर काही लोकांना मोठ्या वयातही मुरुमांची समस्या उद्भवते, आणि ज्यासाठी त्यांचा आहार जबाबदार असतो. दरम्यान, काही लोकांच्या आहारामध्ये जास्त तेलकट पदार्थ असतात, ज्यामुळे त्यांची त्वचा तेलकट होते आणि त्वचेवर कायम पुरळ येत राहतात.

चेहऱ्यावर येणारे पुरळ तुमचे सौदर्यं घालवतेच मात्र सर्व रंग काढून घेते, आणि यामुळे त्वचेवर डाग पडायला लागतात त्यामुळे त्वचेची चमकही कमी होते. मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी कॉस्मेटिक उत्पादने वापरल्यानंतर त्वचेवर दुष्परिणाम दिसून येतो, आणि जर तुम्हालाही चेहऱ्यावरील मुरुमांमुळे त्रास होत आहे, तर त्यावर तुम्ही घरगुती उपाय करू शकता आज आम्ही तुम्हाला काही उपयुक्त फेस पॅकबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही घरी बनवू शकता आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल, तसेच मुरुम आणि त्यांच्या खुणा दूर होतील.

मुलतानी माती आणि रोझ वॉटर पॅक:
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर त्यासाठी मुलतानी माती हा उत्तम पर्याय आहे, तसेच ती चेहऱ्यावरील तेल शोषून घेण्यास मदत करते. मुलतानी मातीचा पॅक बनवण्यासाठी मुलतानी माती पावडरमध्ये गुलाबजल आणि लिंबूचे काही थेंब मिसळा व आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि ते चेहऱ्यावर लावा.

कोरफड आणि हळद पॅक:
दाहक-विरोधी गुणधर्माने समृद्ध कोरफडीमध्ये हळद मिसळून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास मुरुमांपासून तुम्हाला सुटका मिळेल. तसेच हळद त्वचेवर चमक आणते, आणि त्वचेवर उपचार करते.

कडुलिंब आणि गुलाब पाणी पॅक:
अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध असलेले कडुलिंब त्वचा आणि केसांसाठी खूप उपयुक्त ठरतात. कडुलिंबाच्या वापराने चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग नाहीसे होतात. तसेच कडुलिंब आणि गुलाब पाणी बनवण्यासाठी कडुलिंबाची पाने बारीक करून त्याची पेस्ट बनवून घ्या तर त्यामध्ये गुलाबजल मिसळून घ्या व ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15 ते 20 मिनिटांनी चेहरा कोरडा होऊ द्या व नंतर चेहरा स्वच्छ धुवा.

मध आणि मिंट पॅक:
त्वचेसाठी मध हे सर्वांत उत्तम टॉनिक आहे. मध आणि पुदिन्याचा पॅक बनवण्यासाठी पुदिन्याची पाने बारीक करून त्यामध्ये थोडे मध मिसळून त्याची पेस्ट बनवून घ्या. तर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि चेहरा कोरडे होऊ द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Home Made Pack for Pimples follow tips checks details 15 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Home Made Pack for Pimples(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या