12 August 2020 9:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

आता अपग्रेडेड गूगल क्रोम येणार...'गूगल क्रोम ७६'

Google, Google Chrome, Google Chrome 76, Web Browser, Operating System, Google Technology

मुंबई : सर्च इंजिन, ई-मेल, ऑपरेटिंग सिस्टीम आदी विविध क्षेत्रात अग्रणी असलेले गुगल आपले वेब ब्राऊजर गूगल क्रोम अपग्रेड करणार आहे. आज म्हणजेच ३० जुलैला गूगल क्रोम ७६ रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी गूगल क्रोम वापरणाऱ्यांकडून काही तक्रारी येत होत्या. त्यांच्या डेटावर काही वेबसाईटद्वारे लक्ष ठेवण्यात येत असल्याच सांगतलं जात होत.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

या प्रकरणाची गंभीर दाखल घेत गूगल ने क्रोम अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे. गूगल क्रोम ७६ या नव्या अपग्रेडमध्ये युजर्सच्या खाजगी गोष्टींबाबत जास्त खबरदारी घेतली जाणार आहे. तसेच क्रोम अधिक सुरक्षित करण्यासाठी काही नवीन फीचर्स लॉन्च करण्यात येणार आहेत. गूगल क्रोमच्या सगळ्या वेबसाईट साठी अँडॉब फ्लॅशचा पर्याय असणार आहे. युजर्स ना हा पर्याय काढून टाकता येणार नाहीये. फ्लॅशचा वापर फक्त क्लीक टू प्ले मोड मध्येच करता येणार आहे.

२०२० नंतर क्रोम फ्लॅश प्लेअरला सपोर्ट करत नसल्याचा नोटिफिकेशन युसर्सला देण्यात येईल. क्रोम ७६ मध्ये ऑटोमॅटिक डार्क मोड, फ्लॅश डिसेबल,प्रायव्हसी या गोष्टीवर जास्त लक्ष देण्यात आलेल आहे. आता देता सुरक्षित नाही असे युजर्सना नक्कीच वाटणार नाही. त्यांच्या गोष्टी आता क्रोम तर्फे खाजगी ठेवल्या जाणार आहेत. हे युजर्ससाठी नक्कीच कभदायक ठरणार आहे. व आता दिलखुलास पणे युजर्स क्रोम चा वापर करू शकतात.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#gadgets(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x