2 June 2023 9:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PCBL Share Price | पीसीबीएल शेअरने 77,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा, आता अजून 31 टक्के परतावा देईल, डिटेल्स पहा Rama Steel Tubes Share Price | जबरदस्त शेअर! मागील 3 वर्षांत रामा स्टील ट्यूब्स शेअरने गुंतवणूकदारांना 3660% परतावा दिला, डिटेल्स पहा Adani Total Gas Share Price | स्वस्त झालेला अदानी टोटल गॅस शेअर खरेदी करावा का? शेअर पुढे मोठा परतावा देईल? तज्ज्ञ काय सांगतात पहा Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 03 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 03 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Tega Industries Share Price | टेगा इंडस्ट्रीज शेअरने 1 वर्षात 115% परतावा दिला, तर मागील 1 महिन्यात 31% परतावा दिला, डिटेल्स पहा Gold Price Today | बापरे! आज सोन्याच्या दरांनी चिंता वाढवली, तुमच्या शहरात 10 ग्राम सोन्याचा नवा दर किती झाला पहा
x

Google Pixel 7a 5G | गुगल पिक्सल 7 ए स्पेसिफिकेशन लीक, 64 MP कॅमेऱ्यासह हे फीचर्स मिळतील, जाणून घ्या डिटेल्स

Google Pixel 7a 5G

Google Pixel 7a 5G | गुगल पिक्सल 7 ए गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. अखेर १० मे रोजी गुगलच्या इव्हेंटमध्ये कंपनी याला लाँच करू शकते. या मिड बजेट स्मार्टफोनबद्दल काही डिटेल्स समोर आल्या आहेत. खरं तर एका टिप्सटरने या स्मार्टफोनबद्दल काही डिटेल्स जारी केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पिक्सल 7 सीरिजप्रमाणेच गुगलचा हा आगामी फोनदेखील टेन्सर 2 चिपसेटसह येणार आहे. याशिवाय यात 64 मेगापिक्सल कॅमेरा, ओएलईडी डिस्प्ले सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात. जाणून घेऊया गुगलच्या या आगामी स्मार्टफोनबद्दल.

मिळू शकतात ही आश्चर्यकारक वैशिष्ट्ये
भारतीय टिप्सटर देबान रॉय यांनी पिक्सल 7 ए च्या मुख्य स्पेसिफिकेशन्सबद्दल माहिती शेअर केली आहे. टिप्सटरच्या म्हणण्यानुसार, गुगलचा हा हँडसेट 6.1 इंचाचा एफएचडी + ओएलईडी डिस्प्लेसह येऊ शकतो. याचा डिस्प्ले ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. यात गुगल टेन्सर जी२ प्रोसेसर मिळेल. तसेच, एलपीडीडीआर 5 रॅम आणि यूएफएस 3.1 स्टोरेज सपोर्ट करेल.

गुगल पिक्सल ७ ए च्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. यात ६४ मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स७८७ प्रायमरी सेन्सर, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा असेल. हा फोन अँड्रॉइड १३ ऑपरेटिंग सिस्टिमसह येऊ शकतो. यात ५ वॉट वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

टिप्सटरने स्पेसिफिकेशनसह फोनचे फोटोही शेअर केले आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये १०.८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. पिक्सल 7 ए बद्दलच्या आधीच्या रिपोर्टनुसार, हा फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज सपोर्टसह येऊ शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Google Pixel 7a 5G smartphone information leaked on internet check details on 14 March 2023.

हॅशटॅग्स

#Google Pixel 7a 5G(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x