Nothing Phone 3 | Nothing Phone 3 पुढील महिन्याच्या सुरवातीला लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन 1 जुलैला लाँच होईल. या स्मार्टफोन्समध्ये कंपनी अनेक मोठे बदल करू शकते. नथिंग त्याच्या ग्लिफ मॅट्रिक्सचा पुनर्निर्माण करेल. हा स्मार्टफोन Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसरसह येईल.
फोनमध्ये दमदार फीचर्स मिळतील. कंपनीने सांगीतले आहे की हा त्यांचा ट्रू-फ्लॅगशिप फोन असेल. स्मार्टफोन 1जुलै रोजी लाँच होणार आहे, यासंबंधी सर्व माहिती समोर येत आहे. चला तर मग जाणून घेऊया या फोनमध्ये काय काही मिळेल.
Nothing Phone 3 चे फीचर्स लीक
लीक रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, Nothing Phone 3 मध्ये 6.7-इंच LTPO OLED डिस्प्ले मिळेल, जो 1.5K रेजोल्यूशनसह येईल. स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसरसह लॉन्च केला जाईल. हा फोन Nothing OS 3.5 वर काम करेल, जो Android 15 वर आधारित असेल.
ब्रँडने पुष्टी केली आहे की हा स्मार्टफोन 5 वर्षांच्या ऑपरेटिंग सिस्टम अपडेट आणि 7 वर्षांच्या सुरक्षा अद्यतनांसह येईल. हा handset 5150mAh च्या बॅटरीसह येईल, जो 100W चार्जिंग सपोर्ट करेल. यात वायरलेस चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग फीचर असणार आहे.
कंपनी त्यांच्या फोनच्या डिझाइनमध्ये काही बदल करणार आहे. स्मार्टफोनच्या मागील कॅमेरा एका त्रिकोण आकारात असेल. स्मार्टफोनमध्ये 50MPचा मुख्य लेंस, 50MPचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 50MPचा पेरिस्कोप लेंस मिळेल. तसेच, फ्रंटमध्ये कंपनी 32MPचा सेल्फी कॅमेरा देऊ शकते. हा फोन eSIM सपोर्ट आणि NFC सपोर्टसह येईल.
किती असणार आहे किंमत?
Nothing Phone 3 कंपनी 800 डॉलर किंमतीत लाँच करणार आहे. या फोनसोबत कंपनी Nothing Headphone 1 देखील लाँच करू शकते. याचे फर्स्ट लुक देखील समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, या डिव्हाइसची किंमत 309 डॉलर असणार आहे. या डिव्हाइसचे विकास कंपनीने ब्रिटिश ऑडियो ब्रँड KEF सोबत मिळून केला आहे.
