7 May 2025 1:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

OnePlus 10T 5G Smartphone | वनप्लसचा 10T 5G स्मार्टफोन लाँच होतोय | 50MP कॅमेरा आणि बरंच काही

OnePlus 10T 5G

OnePlus 10T 5G Smartphone | वनप्लस एकापाठोपाठ एक आपले नवे स्मार्टफोन बाजारात लाँच करत आहे. या संदर्भात आता कंपनी वनप्लस 10 टी लाँच करणार आहे. वनप्लसचा हा आगामी स्मार्टफोन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. भारतीय युजर्सही या फोनची आतुरतेने वाट पाहत आहेत. फोनच्या लाँचिंगच्या तारखेबद्दल कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही, मात्र यादरम्यान टिप्स्टर प्राइसबाबाने या स्मार्टफोनच्या लाँचिंगची तारीख जाहीर केली आहे.

भारतात लाँच होणार :
प्राप्त बातमीनुसार हा फोन 25 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान भारतात लाँच केला जाऊ शकतो. लीकनुसार, फोनचा पहिला सेल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार असून तो अॅमेझॉन इंडियावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, फोनचा १६ जीबी रॅम व्हेरिएंट मूनस्टोन कलर ऑप्शनमध्ये येईल.

स्मार्टफोनची वैशिष्ट्ये :
फोनमध्ये कंपनी 6.7 इंचाचा फुल एचडी+ ई4 एमोलेड डिस्प्ले देऊ शकते. हा डिस्प्ले एलटीपीओ तंत्रज्ञान आणि १२० हर्ट्जच्या रिफ्रेश रेटसह येऊ शकतो. फोनमध्ये आढळणारे हे डिस्प्ले सेंटर पंच-होल डिझाइन आणि पातळ बेझलसह असेल. डिस्प्लेमध्ये, कंपनी अंडर-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर देखील देऊ शकते. वनप्लस १० टी १६ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजमध्ये येईल.

50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा :
प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 चिपसेट देणार आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या रियरमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर असलेला 8 किंवा 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्सचा समावेश असू शकतो.

सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा :
त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा किंवा 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. फोनला पॉवर देण्यासाठी कंपनी याला 150 वॅट फास्ट चार्जिंगसह 4800 एमएएचची बॅटरी देऊ शकते. ओएस बद्दल बोलायचे झाले तर हा फोन अँड्रॉयड 12 वर आधारित ऑक्सिजन ओएस 12.1 वर काम करेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: OnePlus 10T 5G Smartphone will be launch soon check details 08 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#OnePlus 10T 5G(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या