12 December 2024 3:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे
x

Realme Narzo 50i Prime | रियलमी नार्जो 50i प्राईम स्मार्टफोन एंट्री लेवल प्राइसवर लॉन्च | जबरदस्त फीचर्स

Realme Narzo 50i Prime

Realme Narzo 50i Prime | रियलमीने आपला नवीन एन्ट्री-लेव्हल स्मार्टफोन रियलमी नार्जो 50i प्राइम लाँच केला आहे. या फोनमध्ये युझर्सला युनिसॉस टी 612 प्रोसेसर आणि 4 जीबी पर्यंत रॅम मिळणार आहे. चला जाणून घेऊयात की हा फोन सिंगल रियर कॅमेरा आणि मोठी बॅटरी सोबत येतो.

स्मार्टफोनच्या खास गोष्टी :
फोनच्या खास गोष्टीबद्दल बोलायचे झाले तर, रियलमीच्या या एंट्री लेव्हल फोनमध्ये ५० एमएएचची बॅटरी, अँड्रॉइड ११ (गो एडिशन) मिळते. रियलमी नार्जो 50i प्राइममध्ये 6.5 इंचाचा एचडी + एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 720 x 1600 पिक्सल रेझ्युलेशन आणि वॉटरड्रॉप नॉचसह येतो. वॉटरड्रॉप नॉचच्या आत, यात सेल्फी कॅमेरा आहे.

खेळण्यासाठी MaliG 52 GPU :
या नवीन डिव्हाइसमध्ये ऑक्टा-कोर युनिसोक टी 612 प्रोसेसर आणि खेळण्यासाठी MaliG 52 GPU मिळतो. नुकत्याच लाँच झालेल्या रियलमी सी ३० मध्ये देण्यात आलेला हाच प्रोसेसर आहे. यात ४ जीबी पर्यंत रॅम आणि ६४ जीबी पर्यंत स्टोरेज मिळते. फोनमध्ये मायक्रो-एसडी कार्ड स्लॉट देखील आहे ज्यातून स्टोरेज वाढवता येईल.

8 मेगापिक्सेलचा रिअर शूटर :
कॅमेरा म्हणून, नार्जो 50 आय मध्ये 8 मेगापिक्सेलचा रिअर शूटर आणि मागील बाजूस एलईडी फ्लॅश आहे. त्याचबरोबर फोनच्या फ्रंटमध्ये 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. ग्रीन आणि ब्लू अशा दोन कलर ऑप्शनमध्ये ग्राहक हा फोन घरी आणू शकतात.

5000mAh ची बॅटरी :
पॉवरसाठी, नार्जो 50 आय प्राइममध्ये 5000 एमएएचची बॅटरी आहे, जी मायक्रो-यूएसबी चार्जिंग पोर्टवर 10 डब्ल्यू चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम, ४जी, वायफाय, ब्लूटूथ ५.१, जीपीएस आणि ए-जीपीएस दिले आहे. यात 3.5 एमएम हेडफोन जॅक देखील आहे, आणि अँड्रॉइड 11 (गो एडिशन) सह येतो.

दोन स्टोरेज व्हेरिएंट :
रिअलमी नार्जो ५० आय प्राइम ३ जीबी + ३२ जीबी आणि ४ जीबी + ६४ जीबी या दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. याच्या ३ जीबी + ३२ जीबी व्हेरिएंटची किंमत ९९.९९ डॉलर (अंदाजे ७,८२० रुपये) आहे. त्याचबरोबर याच्या ४ जीबी + ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत १०९.९९ डॉलर (सुमारे ८,६०० रुपये) आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Realme Narzo 50i Prime launched in India check details 23 June 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x