1 May 2025 3:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

Redmi 11 Prime 5G | रेडमीचा नवा 11 प्राइम 5G स्मार्टफोन लाँच होतोय, 5000mAhच्या दमदार बॅटरीसह शानदार फीचर्स, किंमत पहा

Redmi 11 Prime 5G smartphone

Redmi 11 Prime 5G | शाओमीचा नवीन रेडमी 11 प्राइम 5G फोन 6 सप्टेंबर 2022 रोजी लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन आधी लाँच करण्यात आलेल्या रेडमी १० प्राइम 5G फोनचा उत्तराधिकारी असेल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरच्या माध्यमातून कंपनीने या फोनच्या लाँचिंगबाबत माहिती दिली आहे. भारतात या फोनची किंमत बजेट फ्रेंडली असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंपनी हा फोन दोन रंगात ऑफर करू शकते.

स्पेसिफिकेशन्स :
रेडमी ११ प्राइम 5G फोनचा डिस्प्ले ६.५८ इंचाचा, रिझोल्युशन फुल एचडी + स्क्रीन, टाइप आयपीएस एलसीडीसह रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज सांगण्यात येत आहे. स्क्रीनला मोठा आणि अनोखा लूक देण्यासाठी आणि कॅमेरा बबलसारखा वेगळा दिसावा यासाठी फोनमध्ये ट्रेंडी वॉटरड्रॉप नॉच तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. रेडमी ११ प्राइम 5G फोनमध्ये मीडियाटेक डायमेनसिटी ७०० एसओसी प्रोसेसर वापरण्याची शक्यता आहे. या फोनचा कॅमेरा सेटअप ड्युअल असेल. यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असणार आहे. ड्युअल सेटअप रियर कॅमेरा असलेला हा फोन एलईडी फ्लॅशसोबत येणार आहे.

बॅटरी :
ड्युअल सिम असलेल्या या फोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटी सपोर्ट असेल. पुढील महिन्यात लाँच होणाऱ्या या फोनची बॅटरी 5,000 mAh इतकी असणार आहे. हे चार्ज करण्यासाठी 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट केला जाईल. नवीन बजेट रेडमी ११ प्राइम ५ जी फोन अँड्रॉइड १२ बेस्ड ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. असे सांगितले जात आहे की, हा फोन एमआययूआय १३ सह चांगल्या प्रवेशक्षमतेसाठी डिझाइन केला गेला आहे. टिप्स्टर योगेश ब्रार यांच्या मते, रेडमी 11 प्राइम 5G ही कंपनीच्या रेडमी नोट 11 ई ची रिब्रँडेड आवृत्ती आहे, जी चिनी मोबाईल निर्मात्याने यावर्षी मार्च महिन्यात आपल्या देशात लाँच केली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Redmi 11 Prime 5G smartphone will be launch soon check details 31 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Redmi 11 Prime 5G smartphone(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या