3 May 2025 5:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL
x

Vivo V25 5G Smartphone | विवो V25 5G लाँच होणार, 50 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि बरंच काही मिळणार

Vivo V25 5G Smartphone

Vivo V25 5G Smartphone | विवोचा आगामी फोन विवो व्ही २५ आजपासून तीन दिवसांनी म्हणजेच १५ सप्टेंबर रोजी भारतात लाँच होणार आहे. विवोने ही माहिती दिली आहे. विवो व्ही 25 प्रो फोननंतर साधारण महिन्याभरानंतर V25 सीरीजचा आणखी एक फोन देशात लाँच होणार आहे. कंपनीने ऑगस्टमध्ये आपला प्रीमियम फोन विवो V25 प्रो देशात लाँच केला होता.

हे फीचर विवो व्ही 25 फोनमध्ये मिळणार :
व्ही 25 प्रो प्रमाणे या नव्या विवो व्ही25 फोनमध्येही कलर चेंजिंग डिझाइन असणार आहे, जे खास बनवेल. विवो व्ही 25 ची फ्रेम डिझाइन फ्लॅट एज असेल, तर व्ही 25 प्रो फोनमध्ये कर्व्ड फ्रेम आहे. विवो व्ही 25 मध्ये वॉटरड्रॉप स्टाईल नॉच मिळेल. तर विवोच्या V25 प्रो फोनमध्ये पंच होल कट आउट केले आहे.

डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, विवोच्या व्ही 25 फोनचा डिस्प्ले साइज 6.44 इंच आहे. यात 1080 पिक्सल रिझॉल्यूशनसह एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज आहे. मीडियाटेक डायमेनसिटी ९०० चिपसेट प्रोसेसर या फोनमध्ये मिळणार आहे. विवो व्ही २५ फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. यात अँड्रॉइड १२ आऊट ऑफ द बॉक्सवर आधारित फनटच ओएस १२ ऑपरेटिंग सिस्टम मिळेल.

ट्रिपल रियर कॅमेरा सेट :
फोटोग्राफीच्या बाबतीत सांगायचं झालं तर या विवो व्ही25 फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेट असणार आहे. फोनच्या मागील बाजूस ओआयएससह ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ एमपी ओव्हरवाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर असेल. सेल्फी आणि व्हिडिओसाठी व्ही 25 फोनमध्ये आय ऑटोफोकस टेकसह 50 एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळेल, जो सेल्फीप्रेमी युजर्ससाठी मोठं आकर्षण ठरू शकतो.

4,500mAh’ची बॅटरी :
फोनमध्ये 4,500mAh’ची बॅटरी आहे, जी चार्ज करण्यासाठी फोनमध्ये ४४ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. विवो व्ही 25 प्रो प्रमाणेच हा विवो व्ही25 देखील 5 जी कनेक्टिविटीला सपोर्ट करेल. अशी अपेक्षा आहे की विवो व्ही २५ ची किंमत व्ही २५ प्रोपेक्षा किंचित कमी असेल. भारतात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह विवो व्ही २५ प्रो व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपयांपासून सुरू होते. तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या विवो व्ही २५ प्रो व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Vivo V25 5G Smartphone will be launch on 15 September check details 21 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vivo V25 5G Smartphone(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या