11 July 2020 1:30 PM
अँप डाउनलोड

आता व्हॉट्सअँप मेसेज ट्रेस करता येणार.

IIT Madras, Whatapp Message, Tress

मुंबई : व्हॉट्सअँप म्हणजे सध्याच्या काळात दोन व्यक्तींना जोडणारा दुवा आहे. हे मेसेज व्हॉट्सअँप कंपनी किईव एखादी एजन्सी अथवा कोणताही तिसरा व्यक्ती वाचू शकत नाही. तुमचे मूळ मेसेज हे कोणीही ट्रेस करू शकत नाही. त्यामुळेच कित्येक वेळा अफवा पसरवल्या जातात. तेच मेसेज कित्येक लोकांना फॉरवर्ड केले जातात. मात्र त्यामुळे लोकांची फसवणूक होते व खोटे मेसेज लोकांपर्यंत पोहोचतात.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पण हे खोटे मेसेज कोण बनवत आणि मग ते फॉरवर्ड केले जातात हे आता ट्रेस करता येणं शक्य होणार आहे. असा दावा आयआयटी मद्रासच्या प्राध्यापकांनी कोर्टात केला आहे. व्हॉट्सअँपमध्ये मेसेज पाठवणाऱ्याला ट्रेस करता येऊ शकत अशा प्रकारचं टूल कंपनीने तयार करावं असं भारत सरकारने अनेकदा व्हॉट्सअँप कंपनीला सांगितलं होत. बोगस वृत्त आणि अफवांवर नियंत्रण आणणे हा त्यामागील उद्देश आहे.

मात्र हे शक्य नाही असं व्हॉट्सअँप ने सांगितलं होत. आता व्हॉट्सअँप वरील मूळ मेसेज ट्रेस करता येणं तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्याचा दावा आयआयटी मद्रासचे प्राध्यापक व्ही. कमाकोटी यांनी मद्रास हायकोर्टात केला आहे. त्यामुळे आता खोटे मेसेज अफवा पसरण नक्कीच बंद होईल. त्यामुळे लोकांची फसवणूक करणारे लोक पकडले जातील.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#gadgets(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x