15 December 2024 1:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

Xiaomi CIVI 2 Smartphone | शाओमीने आपला नवा स्मार्टफोन CIVI 2 लाँच केला, तगडे फिचर्स आणि बरंच काही मिळणार

Xiaomi CIVI 2 Smartphone

Xiaomi CIVI 2 Smartphone | शाओमीने आपला नवा स्मार्टफोन सिवी २ लाँच केला आहे. फोनमध्ये कंपनी सेल्फी कॅमेऱ्यासाठी पिल शेप कटआउट्स देत आहे. यामुळे फ्रंटकडून त्याचा लूक काहीसा आयफोन १४ आणि आयफोन १४ प्रो मॅक्ससारखाच आहे. कंपनीचा हा लाइफस्टाइल हँडसेट आहे. फोनचा एकूण लूक शाओमी १२ सीरीज आणि रेडमी के ५० सीरीज सारखाच आहे. चीनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची सुरुवातीची किंमत सुमारे २७,२९० रुपये आहे. या फोनमध्ये कंपनी 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि 67 वॉट फास्ट चार्जिंग सारखे उत्तम फीचर्स देत आहे. चला जाणून घेऊया सविस्तर. लवकरच भारतातही उपलब्ध होणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स :
फोनमध्ये ६.५५ इंचाचा कर्व्ड ओएलईडी डिस्प्ले असून त्याचे रेझ्युलेशन २४००x१०८० पिक्सल आहे. हा डिस्प्ले १२० हर्ट्जचा रिफ्रेश रेट आणि २४० हर्ट्जचा टच सॅम्पलिंग रेट सोबत येतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ देखील देण्यात आला आहे. हा फोन एलपीडीडीआर ४ एक्स रॅममध्ये १२ जीबी पर्यंत आणि यूएफएस २.२ स्टोरेज ऑप्शनमध्ये २५६ जीबी पर्यंत लाँच करण्यात आला आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी यामध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट देत आहे. तसेच यामध्ये स्टेनलेस व्हीसी लिक्विड कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे, जेणेकरुन जास्त वापरादरम्यान फोन गरम होणार नाही.

फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ३ कॅमेरे :
फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देत आहे. त्यांच्याकडे ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असून २० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. फोनमध्ये देण्यात आलेला 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा ओआयएस म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन फीचरसोबत येतो.

सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा :
सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जात आहे. अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 4500 एमएएचची बॅटरी आहे. ही बॅटरी ६७ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला या फोनमध्ये ड्युअल सिम, 5 जी, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे पर्याय देण्यात आले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Xiaomi CIVI 2 Smartphone launched check price in India 28 September 2022.

हॅशटॅग्स

#Xiaomi CIVI 2 Smartphone(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x