3 May 2025 7:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Health First | स्त्रियांमध्ये सर्वाधिक आढळणारा 'ऍनिमिया' आजार आहे तरी काय? - नक्की वाचा

Anemia disease symptoms in Marathi

मुंबई , ०६ ऑगस्ट | ऍनिमिया हा आजार जास्त करून स्त्रियांमध्ये आढळला जातो आणि त्याचे अनेक दुष्परिणाम देखील दिसून येतात. चला, जाणून घेऊया याची कारणे आणि उपाय. ऍनिमियामध्ये रक्तातील तांबड्या पेशींची संख्या कमी होते. तसेच हिमोग्लोबिनचे प्रमाण सुद्धा कमी होते. जेव्हा असे होते तेव्हा शरीरातील विविध अवयवांच्या उतीपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही. ऍनिमियाचे अनेक प्रकार दिसून येतात जसे की Iron deficiency anemia, pernicious anemia, megalobastic anemia, sickle cell diseases, thalassemia.

ऍनिमियाची होण्यामागे अनेक कारणे आहेत जसे की रक्तस्त्राव झाल्याने होऊ शकतो, जेवणातील लोह, व्हिटॅमिन, कमी असल्यामुळे, योग्य वयापूर्वीच गर्भावस्था येण्याऱ्या स्त्रीमध्ये, मासिक पाळीच्या वेळी अधिक रक्तस्त्राव झाल्याने देखील ऍनिमिया होऊ शकतो. याची अनेक लक्षणे सुद्धा आहेत जसे की शरीर पांढरे पडणे, निस्तेज होणे, चक्कर येणे, छातीत धडधडणे, भूक मंदावणे, चेहरा/पाय/ शरीरावर सूज येणे, धाप लागणे इत्यादी.

हिमोग्लोबिनचे प्रमाण पुरुषांमध्ये १३.५ ते १७. ५ तर स्त्रियांमध्ये १२.० ते १५.५ इतके असावे. जर जास्त वेळ ऍनिमिया राहिला तर शरीर दुबळे होण्याची शक्यता असते . त्यामुळे यीग्य वेळी उपचार घेणे गरजेचे असते. या उपचारामध्ये पूरक औषधे, व्हिटॅमिन दिले जाते, रक्त कमी असल्यास रुग्णास रक्त दिले जाते. ऍनिमिया होऊ नये म्हणून काळजी अशी घ्यावी की संतुलन आहार घ्यावा, मद्यपान आणि व्यसनापासून दूर राहणे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Anemia disease symptoms in Marathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या