19 August 2022 3:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PMVVY Scheme | विवाहित जोडप्यांना दरमहा 18500 रुपये मिळण्याची गॅरंटी, 100% सुरक्षित सरकारी योजना जाणून घ्या Tatkal Passport Service | काय आहे तात्काळ पासपोर्ट सेवा, कसा करावा ऑनलाइन अर्ज, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया IRCTC Ticket Booking | रेल्वेनं लाँच केलं अ‍ॅप, रांगेत उभे न राहता स्टेशनच्या 5 किमी अंतरात तिकीट बुक करा Mutual Funds | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सोपे, पण फंडातून बाहेर कसे पडावे?, पैसे काढण्याचा मार्ग जाणून घ्या Investment Tips | या योजनेत दररोज 233 रुपये गुंतवणूक करून तुम्हाला 17 लाख रुपये परतावा मिळेल, योजनेबद्दल जाणून घ्या सरकारी बँका, कंपन्या नंतर मोदी सरकार नेहरूंनी उभारलेल्या देशातील पहिल्या सरकारी पंचतारांकित हॉटेलचे खासगीकरण करणार Box Office Report | 'लाल सिंह चढ्ढा' सिनेमाला 100 कोटींचा तोटा होऊ शकतो, रक्षाबंधन सिनेमाला सुद्धा प्रचंड नुकसान
x

Benefits Of Carom Seeds | केसांपासून ते त्वचेपर्यंत ओव्याचे आहेत जबरदस्त फायदे

Carom seeds benefits

मुंबई, २३ ऑगस्ट | ओव्याचा सर्वाधिक वापर स्वयंपाकघरात केला जातो. ओव्याचा वापर लोणचे, थालीपीठ, भजी यासारख्या अनेक पदार्थामध्ये केला जातो. तसेच ओवा पोटासंबंधित अनेक विकारांवर गुणकारी आहे. आयुर्वेदातसुद्धा ओव्याला खूप महत्व प्राप्त झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया ओव्याचे महत्वाचे फायदे.

केसांपासून ते त्वचेपर्यंत ओव्याचे आहेत जबरदस्त फायदे (Carom seeds benefits in Marathi) :

* पचनक्रिया सुरळीत होते:
ओव्याचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत मिळते. ओवा अपचन, आंबटपणा, गॅस यावर उपयुक्त आहे. यासाठी अर्धा चमचा ओवा 1 ग्लास पाण्यात मिक्स करून घेवू शकता. यामुळे पोटाचे आजार कमी होणातस मदत मिळते.

* त्वचेसाठी उपयुक्त:
ओव्यामध्ये थायमॉल हा घटक असतो. यामुळे शरीरावरील जळजळ कमी होण्यासाठी सुद्धा ओव्याचा वापर केला जातो. यासाठी ओवा पाण्यात मिक्स करून पेस्ट तयार करावी. जळजळ होणाऱ्या किंवा जखम झालेल्या भागावर ही पेस्ट लावावी. नंतर 5 ते 10 मिनिटांनी स्वच्छ करावे.

* केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त:
केसांचे गळणे कमी करण्यासाठी, पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी ओव्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. यासाठी 2 चमचे ओवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. नंतर पाणी गाळून रिकाम्या पोटी प्यावे. असे केल्याने केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत मिळते.

* भाजी आणि कोशिंबीरची चव वाढवते: (Benefits of Carom seeds) :

ओव्यामध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात. अनेक पदार्थांमध्ये ओव्याचा वापर केला जातो. कडी, भजी, चटणी, यासारख्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. तसेच ओव्याचा वापर मुखवास म्हणून देखील वापर केला जातो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Carom seeds benefits in Marathi health updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x