27 April 2024 10:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | महिलांच्या प्रचंड फायद्याची खास योजना, बचतीवर मिळेल मोठा व्याज दर, परतावा रक्कम? Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार?
x

आत्मनिर्भर ट्विट | जगभर जाणाऱ्या ७०% लसी मेड इन इंडिया | मोदी-शहांना माहित नाही?

Corona Vaccine, Atmanirbharbharat, Modi government

नवी दिल्ली, ०३ जानेवारी: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन देशात कोरोना लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच, भारत देश आत्मनिर्भर होत आहे, याचं हे पहिलं पाऊल असल्याचंही मोदींनी म्हटलं. देशात कोरोना लसीच्या परवानगीची आनंदी बातमी मराठमोळ्या डॉक्टरने अधिकृतपणे दिली, देशवासियांसाठी आणि महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्यामुळे, मोदींनीही आनंद व्यक्त करत वैज्ञानिकांनी देशवासीयांचं स्वप्न पूर्ण केल्याचं म्हटलंय.

त्यानंतर काही वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील अभिनंदन करतात मोदींच्या आत्मनिर्भर भारताचं कौतुक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कंगना रानौत तर भाजपसाठी मार्केटिंग करण्यास २४ तास ऑनलाईन असते आणि त्यामुळे वेळ न घालवता तिने अमित शहांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली.

मात्र देशात विकसित झालेली कोरोना लस ही पाहिली लस नाही याचा देखील या नेत्यांना विसर पडला आहे. स्वतःच्या पक्षाने दिलेल्या आत्मनिर्भर टॅगलाईनच्या मार्केटिंगची संधी मात्र पूणर्पणे कॅश केल्याचं पाहायला मिळालं आहे. वास्तविक जगभरात वापरल्या जाणाऱ्या ७६ टक्के लस या मेड इन इंडिया आहेत हे सत्य न सांगता आत्मनिर्भर टॅगलाईनची मार्केटिंग करण्याचे प्रकार सुरु आहेत. देशातील आरोग्य विषयक संशोधनात भारतीय वैज्ञानिकांचा इतिहास किती मोठा आहे हे सत्य तरुणाईपासून लपवलं जातंय असं म्हणावं लागेल.

जगातील लस संशोधनात सर्वात नावाजल्या जाणार्‍या डॉ. जेरोम किम यांनी देखील कोरोनाव्हायरस साथीच्या आजाराला सामोरे जाण्यासाठी भारताची मोठी भूमिका असेल असं आधीच म्हटलं होतं आणि त्याला कारण भारताचा याविषयातील इतिहास कारणीभूत होता. डॉ. किम यांनी WION’शी संवाद साधताना सांगितले होते की, “लसीकरण करण्याच्या कार्यक्रमांसाठी जगभरात वापरल्या जाणाऱ्या लसींपैकी 70% लसी भारतात बनवल्या जातात. जगातल्या जवळपास प्रत्येक लहान मुलांना मिळालेली लस ही भारतातच तयार केली गेली असं देखील डॉ. जेरोम किम म्हणाले. (सविस्तर मुलाखत येथे वाचू शकता)

यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या वेबसाईटवर देखील भारतातील लस संबंधित संपूर्ण इतिहास आपण पाहू शकता आणि त्यावरून भारत आरोग्य विषयक संशोधनात मोदी सरकार आल्यावर आत्मनिर्भर झाला की भारतीय वैज्ञानिकांचा इतिहास पूर्वीपासून महान आहे याचा अंदाज घ्यावा. (इतिहास येथे वाचा)

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi took to his Twitter account to express his happiness over the emergency use of corona vaccine in the country. Modi also said that this is the first step towards India’s self-reliance. This is a proud moment for the people of the country and for Maharashtra. Therefore, Modi also expressed happiness and said that scientists have fulfilled the dream of the countrymen.

News English Title: Corona Vaccine Atmanirbharbharat campaign of Modi government after emergency approval news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x