13 August 2022 3:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अजब! स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या यामिनी जाधव, यशवंत जाधवांना सोबत घेऊन मुंबईतील भ्रष्‍टाचारी व्यवस्थेला तडीपार करणार? भाजपने जो घाबरेल त्याला घाबरवलं आणि जो विकला जाईल त्याला खरेदी केलं, तेजस्वी यादवांनी अनेकांची लायकीच काढली Mutual Fund Top Up | म्युच्युअल फंड टॉप-अपचा दुहेरी फायदा कसा घ्यावा, मजबूत नफ्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घ्या Viral Video | ती चालत्या गाडीच्या खिडकीबाहेर बॅलेन्स टाकून नाचत होती, पण तिच्यासोबत असं काही धक्कादायक घडलं Horoscope Today | 13 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Small Saving Schemes | गुंतवणूकदारांना दुहेरी लाभ, या लहान बचत योजनांमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा आणि टॅक्स सूट मिळवा Numerology Horoscope | 13 ऑगस्ट, अंकशास्त्रानुसार शनिवारसाठी तुमचा लकी नंबर, शुभ रंग आणि दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Health First | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांची रोग प्रतिकारशक्ती या घरगुती आहाराने वाढवा | केवळ औषधाने नव्हे

immune system

मुंबई, ०६ जून | येत्या काही दिवसांत कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे काही तज्ञांच्या म्हणणे आहे. कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांना जास्त धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी जोपर्यंत लस येत नाही, तोपर्यंत त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवणे खूप गरजेचे आहे. रोग प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी फूड सप्लीमेंट किंवा महाग डायट घेण्याची गरज नाही. त्यासाठी फक्त घरात असलेले खाद्यपदार्थ योग्य पद्धतीने घेण्याची गरज आहे. त्यासाठी आहार तज्ज्ञांनी दिलेले सल्ले;

लोकन आणि सीजनल फळ:
कोरोनादरम्यान, लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दिवसातून कमीतकमी एकदा त्यांना लोकल किंवा हंगामी फळे खायला द्या. जर मुलाला ते आवडत नसेल तर कमीतकमी एक तुकडा खायला दिला तरी चालेल. यामध्ये किवी किंवा जाभूंळ, आंबा, पपई, मनुका यासारख्या फळांचा आहारामध्ये समावेश करा.

गोड आणि काहीतरी साधे खायले द्या:
संध्याकाळी 4 ते 6 वाजेदरम्यान, उपासमारीच्या वेळी काहीतरी निरोगी खाणे आवश्यक आहे. यावेळी मुलांना गोड पदार्थ आणि काहीतरी साधे खायले द्या. उदाहरणार्थ, रोटीमध्ये तूप घालून गुळासोबत गुंडाळून खायला देणे किंवा रवाची खीर किंवा नाचणीचे लाडू खावू घाला.

तांदूळ:
मुलांच्या आहारामध्ये तांदूळाचा समावेश करा. कारण हा पदार्थ लवकर पचन होतो. मुलांच्या डिनरसाठी डाळ, तांदूळ आणि तूप हे उत्तम पर्याय आहेत.

लोणचे किंवा चटणी:
मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यसाठी दररोज आपल्या घरातील लोणचे किंवा चटणी खायला द्या. ही साइड डिश पोटातील चांगल्या बॅक्टेरियांमध्ये वाढ करते.

काजू:
मुलांच्या आहारात काजूचादेखील समावेश करायला हवा. हे मुलांना सक्रिय आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी मदत करत असून सर्व मायक्रोन्यूट्रियन्स देते.

 

News English Summary: Some experts say a third wave of corona is expected in the coming days. The third wave of corona is said to be more dangerous for young children. Therefore, it is very important for young children to boost their immunity until they are vaccinated. There is no need to take food supplements or expensive diets to keep the immune system strong. All you need to do is take home food properly. Advice given by dieticians for this

News English Title: Home remedies for children’s to keep the immune system strong during corona third wave news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x