2 May 2025 11:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

सावधान! | ‘ब्लॅक फंगस’ देशभर पसरतोय | केंद्राकडून साथीचा आजार म्हणून जाहीर, राज्यांनाही सुचना

Mucormycosis Black fungus

नवी दिल्ली, २० मे | देशात एकीकडे कोरोनाचं संकट असताना आता ब्लॅक फंगस हा नवा आजार आला आहे. या आजाराचे रुग्णही देशभरात वाढताना दिसत आहेत. कोरोनामुक्त झालेल्या अनेकांना म्युकरमायकोसीस हा आजार होत असल्याने देशाची चिंता वाढू लागली आहे. दिवसेंदिवस या रुग्णांची प्रमाण वाढत असल्याने केंद्र सरकारही आता सतर्क झालं आहे. हरियाणा, राजस्थान, तेलंगणा या राज्यांनी या आजाराला महामारी म्हणून घोषित केलं आहे. तर आज केंद्र सरकारनेही सर्व राज्यांना या आजाराची नोंद साथरोग कायद्यात करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

महाराष्ट्रासह देशांतील अनेक राज्यांमध्ये या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. या आजारावर वेळीच उपचार न घेतल्यास जीवावर बेतण्याची भीती आहे. रुग्ण वाढू लागल्याने केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळं या आजाराचा समावेश आता इतर साथींच्या आजारामध्ये होणार आहे. त्यानुसार साथरोग कायद्यानुसार उपाययोजना राज्यांना कराव्या लागणार आहेत.

हरियाणा व राजस्थान सरकारने दोन दिवसांपूर्वीच हा निर्णय घेतला असून हा निर्णय घेणारे हरयाणा हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे.व तर आज तेलंगणानेही साथरोग कायद्यात या आजाराचा समावेश केला. त्यापाठोपाठ केंद्र सरकारने सर्वच राज्यांना याबाबत सुचना दिली. त्यामुळं प्रत्येक रुग्णाची नोंद होणार असून देशातील प्रत्यक्ष चित्र समोर येईल. साथरोग कायद्यात या आजाराचा समावेश नसल्याने प्रत्येक रुग्णाची नोंद होत नव्हती. आता त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा काम करेल.

बिहारमधील पाटण्यात या व्हाइट फंगसचे रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्लॅक फंगसपेक्षा जास्त धोकादायक असलेल्या या व्हाइट फंगसचे पनटामध्ये चार रुग्ण आढळले आहेत. हा व्हाइट फंगस (कँडिडोसिस) फुफ्फुसातील संक्रमणाचे मुख्य कारण आहे. फुफ्फुसासोबपतच त्वचा, नख, तोंडाच्या आतील भाग, पोट आणि आतडे, किडनी, गुप्तांग आणि मेंदुला संक्रमित करतो.

PMCH मध्ये मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. एसएन सिंह यांनी सांगितले की, आतापर्यंत अशी चार रुग्ण आढळली आहेत, ज्यांच्यात कोविड-19 ची लक्षणे होती, पण त्यांना कोरोना नसून व्हाइट फंगस होते. या रुग्णांच्या रॅपिड अँटीजन, रॅपिड अँटीबॉडी आणि आरटी-पीसीआर निगेटिव्ह आल्या होत्या. हे सर्व रुग्ण फक्त अँटी फंगल औषधांची ठीक झाले.

कोरोना आणि व्हाइट फंगस, समजणे अवघड:
व्हाइट फंगसमुळे फुफ्फुसात झालेले संक्रमण एचआरसीटीमध्ये कोरोनासारखेच दिसते. त्यामुळे कोरोना आणि व्हाइट फंगसमध्ये अंतर करणे अवघड आहे. व्हाइट फंगस झालेल्या रुग्णांच्या रॅपिड अँटीजन आणि आरटी-पीसीआर निगेटिव्ह येतात. एचआरसीटीमध्ये कोरोना सारखे लक्षण दिसल्यानंतर रॅपिड अँटीबॉडी टेस्ट आणि फंगससाठी बलगमचा कल्चर करणे गरजेचे आहे. ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना या व्हाइट फंगसचा सर्वाधिक धोका आहे. अशा रुग्णांच्या फुफ्फुसांवर हे आक्रमण करू शकते.

प्रतिकारशक्ती कमी असल्याने संक्रमण:
व्हाइट फंगसची कारणे ब्लॅक फंगससारखेच आहेत. रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी असणे, डायबिटीज, अँटीबायोटिकचे सेवन किंवा अनेक दिवसांपासून स्टेरॉयड घेत असलेल्या रुग्णांना व्हाइट फंगसचा धोका आहे.

 

News English Summary: The number of patients with this disease is increasing in many states of the country including Maharashtra. There is a fear of death if the disease is not treated in time. The Union Ministry of Health has taken the matter seriously as the number of patients is increasing. Therefore, this disease will now be included in other contagious diseases. Accordingly, the states will have to take measures as per the communicable diseases law.

News English Title: Mucormycosis Black fungus declared as contagious diseases by union health ministry news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या