15 December 2024 5:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Health First | वजन वाढण्यासाठी सप्लीमेंट्स घेताय? | मग हे नक्की वाचा

Side effects of weight gainer supplements

मुंबई, ०७ सप्टेंबर | सध्याच्या काळात वजन वाढवण्यासाठी अनेक जण नवनवीन प्रयोग करत असतात. काही जण तर दररोज वर्कआउट करतात त्या सोबतच काही प्रोटीन शेक किंवा तत्सम पॉवरयुक्त पदार्थाचे सेवन करतात. विशेष म्हणजे सप्लीमेंट्स घेतल्यामुळे खरच वजन वाढतं का? असा दावा अनेक कंपन्या करतात. पण सप्लीमेंट्स घेतल्यामुळे कोणत्या शारीरिक समस्या उद्भवतात ते आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.

वजन वाढण्यासाठी सप्लीमेंटस घेताय? – Side effects of weight gainer supplements :

श्वसनासंबधी तक्रारी:
सप्लीमेंट्सचे सेवन केल्यामुळे अनेकांना श्वासनासंबंधित तक्रारी जाणवतात. त्यामुळे अशा प्रकारच्या समस्या असल्यास लगेच डॉक्‍टरांचा सल्ला नक्की घ्या.

पोटासंबंधित समस्या:
वजन वाढविण्यासाठी सतत प्रोटीन पावडर किंवा तत्सम पावडरचं सेवन अनेक जण करतात. त्यामुळे अनेक जणांना पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. ज्यात पोट दुखी, पोटात मुरडा येणे. स्वच्छ न होणे अशा समस्या निर्माण होतात.

यकृताची समस्या:
जी व्यक्ती मद्यपान करतात आणि त्याचसोबत वजन वाढवतात आणि पावडरचही सेवन करतात त्यांना लिव्हर विषयी समस्या जाणवू शकतात.

मुतखडा होण्याची समस्या:
प्रमाणापेक्षा जास्त सप्लीमेंट्सचं सेवन केल्यामुळे मुतखडा होण्याची शक्यता असते. या पावडरमध्ये कार्बोहायड्रेट आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकतात.

अतिसार होणे:
अनेक जणांना या सप्लीमेंट्स खाल्यानंतर ॲलर्जी होते. त्यामुळे पोट बिघडून अतिसार होणे यासारख्या समस्या होतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Side effects of weight gainer supplements.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x