25 April 2024 12:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती?
x

Health first | क्षयरोगाच्या रुग्णांनी कोविडची लस घेणे आवश्यक आहे । नक्की वाचा

vaccination for TB patients

मुंबई २२ एप्रिल : जागतिक कोरोना महामारीच्या काळातही क्षयरोग रूग्णांना घरी आवश्यक उपचार देऊन केंद्र आणि राज्य सरकारने केलेले प्रयत्न चांगले आहेत. हे अतिशय महत्त्वाचे होते कारण फुफ्फुसाचा टीबी आणि कोविड -19 हे दोन्ही प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतात. असे असताना क्षयरोगाच्या रुग्णांनी कोविड लसीकरण करून घेणे आवश्यक, असे मत रिजनरेटिव्ह मेडिसिन रिसर्चर डॉ. प्रदीप महाजन यांनी व्यक्त केले आहे.

आपली रोगप्रतिकारक शक्ती स्वाभाविकच संक्रमणाशी लढण्यासाठी सक्षम असतेच तरी देखील साथीच्या काळात जेव्हा संसर्गाचे प्रमाण अधिक असते अशा वेळी आपल्या शरीराला त्या संसर्गाशी लढा देण्यासाठी काही प्रमाणात आधाराची गरज असते. विशेषत: क्षयरोगाच्या संदर्भात, रोगास कारणीभूत असणारे जीवाणू फुफ्फुसात संसर्ग निर्माण करतात आणि श्वास घेण्यास जबाबदार असलेल्या पेशी हळूहळू नष्ट करतात. रोगास आवश्यक प्रतिकार करण्याची शक्ती ही लसीकरणाद्वारे नक्कीच मिळू शकते, रोगाला प्रतिबंध करण्यासाठी तसेच रोगाची लढण्यासाठी पुरेशी प्रतिकारक्षमता या लसीकरणाद्वारे प्राप्त करता येऊ शकते.

जेव्हा लसीकरणाच्या दोन किंवा अधिक डोसांचा सल्ला दिला जातो तेव्हा दीर्घ प्रतिरोधक प्रतिसादाची खात्री करणे आणि संसर्गामुळे उद्भवणारी तीव्रता आणि गुंतागुंत कमी करणे हा मुळ उद्देश असतो. अशाप्रकारे टीबीच्या रूग्णांनी (तसेच इतर गुंतागुत असणा-या रुग्णांनी) कोविड १९ संसर्गाबाबत भीती न बाळगता लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. याकरिता संबंधित डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.तसेच प्रत्येकाने सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्कचा वापर करणे, स्वच्छता राखणे इत्यादी सर्व शिफारसी पाळल्या पाहिजेत. शक्य असल्यास सुरक्षित राहणे चांगले.

News English Summary: Even during the global Corona epidemic, the efforts made by the Central and State Governments to provide essential treatment to TB patients at home are good. This is very important because both pulmonary TB and Covid-19 mainly affect the lungs. However, tuberculosis patients should be vaccinated with covid vaccine, said Dr. Regenerative Medicine Researcher. Expressed by Pradip Mahajan.

News English Title: TB patients should take covid vaccine in Corona crisis news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x