3 May 2025 3:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Health First | पाय मुरगळल्यावर करा त्यावर हे उपचार । नक्की वाचा

home remedies for twisting of leg

मुंबई २७ एप्रिल : बऱ्याचदा खेळताना अथवा ऑफिसमध्ये, घरी कोणतंही काम करत असताना अचानक पाय मुरगळतो. पाय मुरगळला तर लोक बऱ्याचदा गंभीरपणाने घेत नाही. त्यामुळे काही दिवसानी पायातील दुखणे वाढते आणि ते असह्य होते.त्यामुळे तुम्हाला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. मुरगळणे गंभीर असो वा हलक्या पद्धतीचे. पण त्याचा उपचार तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने करू शकता.
पाय मुरगळल्यावर डॉक्टरां कडून सुध्दा घरातच काळजी घेण्याची एक पद्धत सांगितली जाते.

ती म्हणजे RICE… थांबा हं… RICE म्हणजे तांदूळ बांधून दुखऱ्या जागेवर लावायचे असं काही नाही…

तर ‘RICE’ म्हणजे Rest, Ice, Compression आणि Elevation

१) Rest- आराम: पाय मुरगळल्यावर मुरगळलेल्या भागाला आराम देणं, हा दुखापत भरून काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय.

२) Ice – बर्फाने पाय शेकवणे: पाय मुरगळल्या नंतर त्या ठिकाणी बर्फाने शेक दिला तर सूज कमी व्हायला मद्त होते. एका कपड़ामध्ये बर्फ बांधून दर 1-2 तासांनंतर शेक देत रहावा. एका वेळी सलग १० ते १५ मिनिट शेक दिला जाणं गरजेचं आहे.

३) Compression – दुखऱ्या जागेवर बँडेज बांधणे: सूज कमी करण्यासाठी दुखऱ्या जागेवर इलॅस्टिक बँडेज बांधावे.

४) Elevation – पाय मुरगळला असता तो उंच भागावर असेल अशा प्रकारे झोपावे. बसलेले असताना पाय उंचावर राहील अशा प्रकारे फुटरेस्ट किंवा स्टुलवर उशी ठेऊन त्यावर ठेवावा.

घरात काळजी घेण्या बरोबरच अशा वेळी आधी काही घरगुती उपाय सुद्धा करता येतात.

१) मोहरीच्या तेलाचा उपयोग:
पाय मुरगळला असेल आणि त्याबरोबर खरचटले जरी असेल तरी हा उपाय तुम्ही करू शकता.एका पळी मध्ये ५-६ चमचे मोहरीचे तेल आणि त्यात अर्धा चमचा हळद आणि लसणाच्या पाच- सहा पाकळ्यांची पेस्ट घेऊन हे मिश्रण १० ते १५ मिनिटे मंद आचेवर गरम करावे. आणि थंड झाल्यावर याने मसाज करावी. मोहरीचे तेल आणि हळद यांचा अँटी-इंफ्लेमेट्री आणि अँटी-फंगल गुण घाव आणि सूज दोनीही साठी उपयोगी ठरतो.

२) सैंधव:
सैंधव मिठात असलेले मॅग्नेशियम सल्फेट स्नायूंच्या दुखण्यात प्रभावी ठरते. एक टब भर असलेल्या गरम पाण्यात कप भर सैंधव मीठ टाकून या पाण्यात अर्धा तास मुरगळलेला दुखरा पाय बुडवून ठेवल्यास दुखण्या पासून आराम मिळतो. यानंतर पाय कोरडा करून त्यावर इलॅस्टिक बँडेज बांधावे.
मुरगळलेला पाय पूर्ण बरा होई पर्यंत रोज दिवसातून एकदा तरी सैंधव मिठाचा असा शेक दिला गेला पाहिजे.

३) एरंडोल चे तेल:
एरंडोल च्या तेलात असलेल्या ट्राय ग्लिसरॉइड आणि रिसिनोलीक ऍसिड मुळे सूज कमी व्हायला मदत होते.

४) लवंगाचे तेल:
लवंगाच्या तेलात ऍनास्थेटीक गुण असतात. त्यामुळे हे नैसर्गिक पेन-किलर सूज कमी करून दुखण्यापासून आराम देते. लावंगाचे दोन-तीन
चमचे तेल घेऊन त्याने दुखऱ्या भागावर हलकेच मॉलिश करावी.

५) हळदीचा लेप:
हळदीचा लेप सूज आणि वेदना कमी करायला उपयोगी ठरतोमुरगळलेला पाय पूर्णपणे बरा होई पर्यंत दिवसातून दोन-तीन वेळा हे करणे फायदेशीर ठरते.

६) अळशीचे तेल:
अळशीच्या तेलाचे काही थेंब कोमट पाण्यात घालून त्यात १५ ते २० मिनिटे पाय ठेवल्यास मुरगळलेल्या पायाला आराम मिळतो.

हे उपाय करून दुखऱ्या पायाला आराम दिला तर मुरगळलेल्या पायाचे दुखणे लवकरच थांबते. आणि आपल्या नेहमीच्या दिनचर्येला आपण सुरुवात करू शकतो.

News English Summary: Often while playing or in the office, doing any work at home, the legs suddenly twist. People often do not take their legs seriously. So after a few days the pain in the legs increases and it becomes unbearable. So you are more likely to suffer. Whether the twisting is severe or mild. But you can treat it easily at home. Doctors also suggest a method of taking care of the legs at home.

News English Title: Use home remedies when your leg is twisted news update article

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या