Horoscope Today | हिंदू धर्मात शास्त्राप्रमाणे प्रत्येक गुरुवारी प्रभू विष्णूचे नामस्मरण केले जाते. बरेच धार्मिक लोक गुरुवारचा दिवस हा प्रभु विष्णूला समर्पित करतात. याचा परिणाम ज्योतिषशास्त्रावर देखील होत असताना पाहायला मिळतो. आज आम्ही तुम्हाला काही राशींबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्यावर विष्णूची कृपा कायम बरसत असते. यामध्ये तुमची रास आहे का पहा.

मेष
मेष राशीच्या व्यक्तींचा प्रिय ग्रह सूर्य आहे. मेष राशीचे व्यक्ती कायम सूर्यासारखे चमकत असतात. दरम्यान आज गुरुवार. आजच्या दिवशी तुम्ही प्रभु विष्णूंचे नामस्मरण केले पाहिजे. तुमच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही.

सिंह
जीवनातील कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना किंवा व्यवसायासंबंधी महत्त्वाचं पाऊल उचलताना तुम्ही घरामधून बाहेर पडल्याबरोबर प्रभू विष्णूंचं नामस्मरण करा. त्याचबरोबर त्यांच्या मूर्ती समोर नतमस्तक होऊन घराबाहेर निघा. तुमची कामे सफल होतील.

धनु
धनु राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस अत्यंत आनंदात जाणार आहे. आजच्या दिवशी प्रभू विष्णूंची उपासना करा. तुमच्या आर्थिक मार्गात येणारे सर्व अडथळे बाजूला होतील.

मकर
आज तुम्ही जीवनात काहीतरी नवीन करू पहाल. आज तुम्हाला मैत्रिणीचे चांगले सहकार्य लाभेल. यासाठी तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी विष्णूंची पूजा केली पाहिजे.

मीन
मीन राशींना आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही व्यवसायात चांगली कमाई कराल.

Latest Marathi News | Horoscope Today 14 November 2024 Marathi News.

Horoscope Today | ‘या’ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कसा राहील, जीवनात आनंद आणि समाधान प्राप्त होईल – Marathi News