Horoscope Today | आजचा दिवस काही राशींच्या पुरुषांसाठी अत्यंत खास दिवस असणार आहे. आजच्या दिवशी अनेकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आजचे नक्षत्र पुष्य असून योग शुभयोग सांगितला आहे. त्याचबरोबर दिनविशेष अतिशय चांगला सांगितला गेला आहे.
मेष :
कौटुंबिक ताण तणाव दिवसभर डोक्यामध्ये असेल. कौटुंबिक वादामुळे मन थोडं विचलित असेल. वाणीवर नियंत्रण ठेवा. आपल्यामुळे एखाद्याचे मन दुखले जाणार नाही याची काळजी घ्या.
वृषभ :
वृषभ राशीच्या व्यक्तींना आज अचानक प्रवास करण्याची वेळ येऊ शकते. त्याचबरोबर आजचा दिवस अत्यंत आनंदाने उत्साहात जाईल. आरोग्य सुदृढ असेल.
मिथुन :
घरी नवीन पाहुणे भेटायला येतील. त्याचबरोबर जुन्या मित्राची ओळख देखील होईल. वडीलधाऱ्या व्यक्तींचं चांगलं सहकार्य लाभेल दिवस उत्तम असेल आणि आरोग्य देखील चांगलं असेल.
कर्क :
तुमच्यामुळे एखाद्या स्फूर्ती मिळेल. आज दिवसभर दडपणात असाल. त्याचबरोबर कायम शांत रहावसं वाटेल.
सिंह :
आज तुमची मौल्यवान वस्तू हरवू शकते त्यामुळे विशेष काळजी घेणे गरजे आहे. बाहेरगावी फिरायला जाण्याचा योग देखील आहे. त्याचबरोबर सिंह राशीच्या पुरुषांच्या राशी भविष्यात आज धनलाभ देखील लिहिला आहे.
कन्या :
तुमची अनेक वर्षांपासूनची गुंतवणूक आज कामी येईल. घरात एखादी नवीन वस्तू येण्याची शक्यता आहे. सून आणि जावयाकडून प्रचंड कौतुक आणि मान मिळेल.
तुळ :
तूळ राशींच्या पुरुषांच्या आयुष्यात आज धनयोग आहे. नोकरी व्यवसायात असणाऱ्या पुरुषांना आज कामामधून गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक :
आज वृश्चिक राशींचे पुरुष देवधर्म करतील. त्याचबरोबर लांबचा प्रवास देखील करावा लागेल. आज सर्व उधारी चुकती होईल.
धनु :
धनु राशींच्या व्यक्तींनी आजच्या दिवशी थोडी सावधानी बाळगली पाहिजे. तुम्ही एखाद्या अडचणीत सापडू शकता. शत्रूपासून लांबच रहा.
मकर :
तुम्ही ज्या कार्यात काम करत आहात ते कार्य भरभराटीचा आणि यशप्राप्तीचं असेल. आजच्या दिवशी सर्व मंगलमय कार्य होतील. तुमच्या हातून दानधर्म करा उदंड आयुष्य लाभेल.
कुंभ :
कुंभ राशींच्या पुरुषांच्या भविष्यात आज व्यवसायातून चांगली बरकत होणार आहे. गुंतवणुकीचे पैसे कामी येतील. कुंभ राशींच्या व्यक्तींना आज एखादा जुना मित्र भेटण्याची शक्यता आहे.
मिन :
मीन राशींच्या व्यक्तींना एखादा लॉटरीत बंपर बक्षीस लागण्याची शक्यता आहे. आज घरी अचानक पाहुणे येतील त्याचबरोबर तुमची तब्येत थोडी नरम असेल.
Latest Marathi News | Horoscope Today 25 October 2024 Marathi News.
