Horoscope Today | सध्या 2024 वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर महिना सुरू आहे. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर स्वतःची जागा बदलतो. गेल्या काही महिन्यांमध्ये देखील ग्रहांनी आपली जागा बदलली आहे आणि काही राशींच्या आयुष्यात प्रकाश देखील पाडलं आहे. सध्याच्या घडीला चंद्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.

दरम्यान वृषभ राशीत आधीच गुरुग्रह स्थानापन्न झाले आहेत. त्यामुळे या दोघांच्या एक होण्याने गजकेसरी राज योगाची निर्मिती होणार आहे. गुरु आणि चंद्र आज म्हणजेच 13 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 1:18 मिनिटांनी एक रूप होणार आहेत. त्याच्या गजकेसरी राजे योगामुळे कोणत्या राशींना याचा जास्तीत जास्त कायदा होणार पाहूया.

वृषभ

चंद्र आणि गुरूच्या गजकेसरी योगाचा चांगला परिणाम वृषभ राशींवर होणार आहे. कारण की चंद्र आणि गुरु वृषभ राशिमध्येच गजकेसरी राजयोग निर्माण करणार आहेत. या राज योगामुळे वृषभ राशींच्या आयुष्यात नवीन सुसंधी प्राप्त होऊ शकतील. व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींना बाजारात चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे.

कन्या

कन्या राशी गुरु आणि चंद्राच्या गजकेसरी राजयोगाचा चांगला फायदा अनुभवायला मिळणार आहे. आज नवीन कार्य हाती घ्याल. त्याचबरोबर कामाच्या नवीन सुसंधी तुम्हाला प्राप्त होतील. आजचा दिवस अत्यंत चांगला आणि आनंदात घालवाल. वैवाहिक जीवनात सुख समृद्धी लाभेल. आज परिवाराबरोबर कुठेतरी बाहेर जाण्याचा चांगला प्लॅन आहे.

वृश्चिक

वृश्चिक राशींना देखील चंद्र आणि गुरूच्या राजयोगामुळे मोठा लाभ होणार आहे. वृश्चिक राशीचे सर्व व्यक्ती आज अतिशय उत्साहाने काम करतील. कामाच्या ठिकाणी प्रमोशन होण्याची देखील शक्यता आहे. आज लहान मुलांबरोबर वेळ घालवा दिवस अत्यंत आनंदात जाईल. तुम्हाला मोठा आर्थिक लाभ पुण्याचा आजचा दिवस आहे.

Latest Marathi News | Horoscope Today Friday 13 December 2024 Marathi News.

Horoscope Today | काही वेळातच ‘या’ राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा