29 February 2024 8:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 01 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर प्राईस घसरणार? तज्ज्ञांनी टार्गेट प्राइस सोबत दिला महत्वाचा सल्ला Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, याआधी 1 वर्षात 200% परतावा दिला, नेमकं कारण काय? Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देतेय फ्री बोनस शेअर्स, अल्पावधीत वाढेल गुंतवणुकीचा पैसा Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! हे टॉप 3 शेअर्स 50 टक्केपर्यंत परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
x

Shukra Rashi Parivartan | या 6 राशींचे नशीब चमकणार! तुमची राशी कोणती? 30 नोव्हेंबरचं शुक्र राशी परिवर्तन अत्यंत शुंभ

Shukra Rashi Parivartan

Shukra Rashi Parivartan | शुक्र 30 नोव्हेंबर रोजी आपल्या मूळ त्रिकोण राशी तुळ राशीत भ्रमण करणार आहे. तुळ राशीत शुक्राची उपस्थिती पैसा, आर्थिक आणि करिअरसाठी खूप फायदेशीर मानली जाते. ज्योतिषीय गणनेनुसार शुक्राचे तुळ राशीतील संक्रमण मेष, मिथुन आणि तुळ या 6 राशींसाठी करिअरप्रगती आणि आर्थिक प्रगती घेऊन येईल.

शुक्र 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजून 4 मिनिटांनी तुळ राशीत संक्रमण करेल. शुक्र तुळ राशीचा स्वामी आहे, त्यामुळे शुक्र संक्रमणाचा प्रभाव अत्यंत लाभदायक आणि सकारात्मक मानला जातो. जाणून घ्या कोणत्या राशींना शुक्र संक्रमणाचा फायदा होईल…

मेष राशी
मेष राशीसाठी शुक्र संक्रमणाचा करिअर, व्यवसाय आणि प्रेम जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. कौटुंबिक संबंध सुधारतील आणि करिअरप्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. अविवाहित लोकांना आपला जोडीदार मिळू शकतो आणि जे लोक भागीदारीत व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप अनुकूल असणार आहे. पैसा धनप्राप्तीत मोठी वाढ होईल.

मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्राचे तुळ राशीत होणारे संक्रमण करिअर आणि व्यवसायात विशेष लाभ मिळवून देईल. या काळात तुमची सर्जनशीलता वाढेल आणि तुमच्या प्रयत्नांना सकारात्मक परिणाम मिळतील. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यासंबंधीची माहिती मिळू शकते. या काळात तुम्हाला गुंतवणुकीचा दुप्पट फायदा मिळेल.

तूळ राशी
शुक्राचे तुळ राशीतील गोचर अत्यंत अनुकूल परिणाम घेऊन येईल. शुक्र आपल्या उच्च राशीत असल्याने आपल्या करिअरमधील सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील आणि व्यवसायात नफा कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. विद्यार्थी आपल्या सर्व प्रयत्नात यशस्वी होतील. आपल्या नात्यात गोडवा येईल आणि कुटुंबातील सदस्यांशी संबंध दृढ होतील. पैसा चांगल्याप्रमाणत घरात प्रवेश करेल.

धनु राशी
तुळ राशीतील शुक्राचे संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ मानले जाते. शुक्र संक्रमणाचा प्रभाव पैसा आणि करिअरच्या बाबतीत महत्त्वपूर्ण लाभ मिळवून देईल. आपल्या जीवनात शारीरिक सुखसोयी वाढतील आणि आपण प्रत्येक प्रयत्नात यशस्वी व्हाल.

मकर राशी
तुळ राशीत शुक्राचे संक्रमण झाल्यामुळे मकर राशीच्या लोकांना धन आणि करिअरच्या बाबतीत विशेष लाभ मिळेल. तुमची पैशांची बचत वाढेल आणि प्रत्येक काम वेळेत पूर्ण होईल. आपण आपल्या व्यवसायात किंवा कार्यालयात बदल करण्याचा विचार करू शकता, जे फायदेशीर ठरेल. नोकरदारांना नवीन संधी मिळतील.

कुंभ राशी
शुक्राचे तुळ राशीत संक्रमण झाल्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना प्रत्येक बाबतीत अनुकूल परिणाम मिळू शकतात. करिअर आणि व्यवसायात यश मिळेल आणि कुटुंबातील सदस्यांसमवेत लांब पल्ल्याच्या सहलीचे नियोजन करू शकता. घरातील वातावरण चांगले राहील. सर्जनशील कार्यात यश मिळेल. आर्थिक लाभासाठी उत्तम काळ असेल.

News Title : Shukra Rashi Parivartan effect on these 6 zodiac signs 28 November 2023.

हॅशटॅग्स

#Shukra Rashi Parivartan(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x