
Shukra Rashi Parivartan | एका ठराविक काळानंतर प्रत्येक ग्रह आपापल्या राशींमध्ये बदल करतात. खर तर त्यांच्या गोचरामुळेच प्रत्येकाच्या राशीमध्ये वेगवेगळे बदल होऊन त्याचे पडसाद वर्तमान तसेच भविष्य जीवनात पाहायला मिळतात. शुक्र हा अतिशय तेजाळून टाकणारा ग्रह आहे. शुक्र ग्रह ज्या राशीमध्ये असतो त्या राशींचं कायम चांगलंच होताना दिसतं.
परंतु सध्याच्या घडीला शुक्र हा शनीच्या मकर राशीमध्ये स्थानापन्न आहे. डिसेंबर महिन्याच्या 28 तारखेला शुक्र कुंभ राशीमध्ये गोचर करणार आहे. शुक्राच्या गोचरामुळे काही राशींना चांगला अनुभव येऊ शकतो तर काहींना सतर्क राहण्याचा सल्ला ज्योतिषांकडून दिला जातो. शुक्राच्या गोचर्याचा वाईट परिणाम कोणकोणत्या राशींना अनंतराव लागणार आहे पाहूया.
कन्या
कन्या राशींनी आज संपूर्ण दिवस सतर्क राहणे फायद्याचे ठरणार. आज तुमच्या वडिलांशी वाद विवाद होण्याची शक्यता आहे. काही गोष्टींमुळे तुमची तब्येत देखील ढासळू शकते. कुटुंबीयांबरोबर तुमचे वादविवाद देखील पुन्हा उफाळून निघू शकतात.
मीन
शुक्राच्या कुंभ राशीमधील गोचरामुळे मीन राशींना जास्तीत समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. तुमच्या जीवनात चांगल्या कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतील त्यामुळे सावध राहा. प्रवासादरम्यान किंवा बाहेर गेल्यानंतर कोणत्याही ठिकाणी जास्तीत जास्त खर्च होऊ शकतो त्यामुळे खिशाला आवर घालण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर आज तुम्हाला तुमच्या तब्येतीची देखील जास्तीत जास्त काळजी घ्यायची आहे.
कर्क
कर्क राशींसाठी डिसेंबर महिना संमिश्र असणार आहे. जीवनात काही चांगल्या तर काही वाईट गोष्टी घडू शकतील. वाईट गोष्टी घडण्यामागे तुमचे कर्म असतील त्यामुळे केव्हाही चांगले कर्म करण्याकडे लक्ष द्या. आज आरोग्य संबंधित तक्रारी संभावतील. आज तुमच्याकडून पैशांची उधळपट्टी होण्याची शक्यता आहे.