26 April 2024 1:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा
x

भाजप आ. अतुल भातखळकरांच ट्विट, पंतप्रधानांची 'मन की बात' ऐकण्यासाठी नागरिकांची गर्दी | नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया

BJP MLA Atul Bhatkhlkar

BJP MLA Atul Bhatkhalkar | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमात देशाला आपला संदेश दिला. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या ९२ व्या पर्वात पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताच्या सामूहिक सामर्थ्याची ताकद देशानेच नव्हे तर जगाने पाहिली आहे.

देशाच्या या सामूहिक शक्तीने एक नवीन चेतना भावना दिली आहे. पंतप्रधान म्हणाले की, आपला देश हा विविधतेत एकता असल्याचे उदाहरण आहे. ते म्हणाले की, भारतासारख्या विशाल देशात हवामान, भाषा, राहणीमान, जीवनशैली, मत, पंथ यासह असंख्य विविधता आहे, असे असूनही प्रत्येक घरात तिरंगा फडकवताना प्रत्येक भारतीय एकाच रंगात आणि भावनेने वाहताना दिसत होता. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी म्हणाले, “या ऑगस्ट महिन्यात तुम्हा सर्वांची पत्रे आणि संदेश पत्रांनी माझ्या कार्यालयाचा तिरंगा केला.

दरम्यान, मोदींनी याच कार्यक्रमात अनेक मुद्यांवर भाष्य केले. त्यानंतर याच विषयाला अनुसरून मुंबईतील भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेन्शन करत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “माझ्या मतदार संघातील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम ऐकण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती असं म्हटलं आहे.

मात्र त्यांनी शेअर केलेल्या फोटोनुसार संबंधित ठिकाणी बसायला सुद्धा मुबलक जागा नसावी. मात्र उपस्थित १२-१५ लोकांना त्यांनी ‘नागरिकांनी गर्दी’ असं म्हटल्याने नेटिझन्स त्यांची जोरदार खाल्ली उडवत आहेत. अनेकांनी फिरकी घेणाऱ्या टिपण्या करताना काहींनी या महागाईत कोण तुमचं ऐकायला येणार असं देखील म्हटलं आहे.

काय आहे ट्विट आणि त्यावरील टिपण्या :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP MLA Atul Bhatkhlkar tweet on Maan Ki Baat netizens reaction check details 28 August 2022.

हॅशटॅग्स

#AtulBhatkhalkar(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x