11 December 2024 9:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार, शिंदेंना बाजूला करण्याची तयारी, अजित पवार मुख्यमंत्री? राज्यात राजकीय त्सुनामी येणार

Eknath Shinde

Ajit Pawar on The Way | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबतच्या युतीत राष्ट्रवादीचे अजित पवार यांना उत्तराधिकारी बनवण्याचा मार्ग मोकळा केला असं वृत्त आहे. शिंदे यांच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या पक्षांतराच्या निकालाची टांगती तलवार असल्याने सत्ताबदल ही केवळ काळाची बाब असं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न साकार करण्याची घाई झाली आहे. त्यांना राष्ट्रवादीच्या ३५-४० आमदारांचा पाठिंबा असल्याने पक्षांतरबंदी कायदा लागू होणार नाही असा देखील इंडियन एक्सप्रेसने धक्कादायक खुलासा केला आहे.

मात्र, २०१९ प्रमाणे भाजपसोबत सरकार स्थापनेचा पेच निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी पक्षाचे संस्थापक शरद पवार यांची संमती घ्यावी, अशी राष्ट्रवादीच्या गटातील वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे. मात्र शरद पवार भाजपसोबत जाण्यास तयार नाहीत असं इंडियन एक्सप्रेसने म्हटलं आहे.

भगव्या पक्षाशी युती करून शेवटच्या टप्प्यात असलेल्या आपल्या राजकीय कारकिर्दीला कलंक लावण्यास शरद तयार नाहीत, असे सांगत त्यांनी अजित पवारांना स्वत:चा निर्णय घेण्यास सांगितले आहे असा धक्कादायक दावा इंडियन एक्सप्रेसने केला आहे. मात्र शरद पवारांच्या जनमानसावर प्रभाव पाडण्याच्या क्षमतेमुळे पक्षश्रेष्ठींच्या विरोधात जाणे म्हणजे राजकीय आत्महत्या असू शकते, याची अजित पवार समर्थकांना जाणीव आहे,’ असे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सावध आमदारांनी शरद पवारांचा आशीर्वाद कसातरी मिळावा यासाठी अजित पवारांवर दबाव टाकला आहे असं देखील पुढे म्हटलं आहे.

अजित पवार आणि अमित शहा यांची भेट :
उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार ८ एप्रिल रोजी संपर्कात आले नव्हते, तेव्हा त्यांनी चार्टर्ड विमानाने भाजप नेते अमित शहा यांची भेट घेऊन अंतिम राजकीय करार केला होता असं म्हटलं जातंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे त्यांच्यासोबत ते खातेवाटपाचा निर्णय घेण्यासाठी गेले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने शिंदे यांना यापूर्वीच धारेवर धरले आहे आणि राजकीय दृष्ट्या कुचकामी सिद्ध झाल्याने त्यांना बाजूला सारलं जाणार आहे. कारण भाजपाला २०२४ अत्यंत महत्वाचा असून त्यात शिंदे काहीच कामाचे नसून उलट भाजपला नुकसान करतील असं भाजपाला वाटू लागल्याने आणि सर्व्हे समोर आल्यानंतर भाजप कामाला लागली होती.

भाजप अत्यंत बिकट परिस्थितीत आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह गमावले असले तरी त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे आणि हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना ठाकरे कुटुंबियांपासून वेगळं करणं अशक्य असल्याची खात्री भाजपला पटली असल्याचं वृत्त आहे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार राज्यातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी तब्बल ३३ जागा महाविकास आघाडीला मिळतील. २०२४ लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपला महाराष्ट्र गमावणे परवडणारे नाही, असे सूत्रांनी सांगितले. भाजपला मुख्यमंत्री म्हणून मराठा चेहरा हवा आहे, कारण ३५ टक्के मतदार आहेत, त्यामुळे अजित पवारांना खेचण्याचा प्रयत्न आहे. भाजपाला एकनाथ शिंदे आणि त्यांचे शिंदे समर्थक यांच्या मुळे एक मोठी भीती आहे, ती भीती म्हणजे जर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ‘हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा विरुद्ध मोदींची माणसं’ अशा टॅगलाईन झाल्यास जनमानस मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्याकडे झुकू शकतो अशी भीती भाजपच्या रणनीतीकरांना असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.

प्रफुल्ल पटेलही भाजपसोबतच्या चर्चेत प्रमुख
शरद पवार यांनी नुकतीच नवी दिल्लीत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली, तेव्हा प्रफुल्ल पटेल अनुपस्थित होते. सुनील तटकरे यांच्यासोबत पटेल हे अजित पवारांच्या भाजप आघाडीत जाण्याला पाठिंबा देत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्यासहित राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते त्यात हसन मुश्रीफ, नवाब मलिक, अनिल देशमुख आणि खुद्द अजित पवारही केंद्रीय चौकशी यंत्रणांच्या रडारवर आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde going out Ajit Pawar will in with BJP check details on 16 April 2023.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x