9 October 2024 4:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | 2975% परतावा देणारा TTML शेअर पुन्हा फोकसमध्ये, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - Marathi News Vodafone Idea Share Price | 9 रुपयाचा पेनी शेअर 3 महिन्यात 43% घसरला, पुढे काय, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचे तिकीट बुक करण्याआधी एक काम करा, स्लीपर कोचच्या पैशात AC मधून प्रवास कराल IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर आला फोकसमध्ये, 343% परतावा देणारा स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News IRFC Vs BEL Share Price | हे PSU शेअर्स करणार मालामाल, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News
x

उद्धव ठाकरे आणि फडणवीसांबद्दल गोड बोलून दोघांना माजी मुख्यमंत्री केलं | तर मराठा म्हणत चंद्रकांतदादांचा पत्ता कट?

Eknath Shinde

Eknath Shinde | राज्यात भाजप-शिंदे गट युतीचं सरकार अस्तित्वात आलं आहे. आता मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार याची उत्सुकता असून, सातारा जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. शिंदे गटातून माजी मंत्री शंभूराज देसाईंना लॉटरी लागणार असल्याचं म्हटलं जातंय. तर भाजपमधून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे दावेदार असल्याची चर्चा रंगलीये.

शिंदेंकडून गोड बोलून राजकीय चेकमेट :
दुसरीकडे अनेकांबद्दल गोड गोड बोलत शिंदे भाजपच्या वरिष्ठांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जातंय. स्व. बाळासाहेबांचं नाव वापरता यावं म्हणून शेवट पर्यंत उद्धव ठाकरेंबद्दल गोड बोलत त्यांनाच मुख्यमंत्री पदावरून पायउतार करण्यासाठी बंड केलं. तसंच गोड गोड ते फडणवीस यांच्यासोबतही बोलत आहेत. त्यानंतर फडणवीसांच काय झालं ते संपूर्ण देशाला माहिती झालं आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होतील असं वाटलं नव्हतं कारण त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील आणि मी सरकारच्या बाहेर राहिन. मात्र आमची सगळ्यांची इच्छा होती की ते मंत्रिमंडळात असावेत. देवेंद्र फडणवीस आमच्या मंत्रिमंडळात असतील तर विकास आणखी वेगाने होईल. त्यानंतर त्यांच्या वरिष्ठांचा त्यांना म्हणजेच भाजपच्या वरिष्ठांचा आदेश आला आणि ते उपमुख्यमंत्री झाले.

लगेच मराठा चेहरा चर्चा सुरु केली आणि चंद्रकांतदादांचा पत्ता कट?
राजकीय नाट्यानंतर भाजपचाच आणि ते ही देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी धारणा झाली होती. शिवाय या व्यतिरिक्त दुसरे काही मनी येईल असेही नव्हते. पण ऐनवेळी पक्षातील वरिष्ठांच्या आदेशानुसार मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली तर पक्षाचा विस्तार करण्याची ईच्छा बोलून दाखविणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळात तर समाविष्ट व्हावे लागले पण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. असे असताना चंद्रकांतन पाटलांवर मंत्रीमंडळातील कोणती जबाबदारी दिली जाणार याची चर्चा सुरु असतानाच त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरच रहावे लागणार आहे. या माध्यमातून पक्षाचा विस्तार करावा लागणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde political steps in focus check details 02 July 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x