27 April 2024 4:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Nitin Gadkari | केंद्र सरकार वेळेवर निर्णय घेत नाही हाच प्रॉब्लेम, गडकरींनी मोदी सरकारचं वास्तव मांडल्याने खळबळ

Nitin Gadkari

Nitin Gadkari | देशातील पहिली डबल डेकर एसी इलेक्ट्रिक बस गुरुवारी मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसली. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नितीन गडकरी आणखी एका कारणामुळे चर्चेत आहेत. भाजपने त्यांना संसदीय मंडळातून हटवलं आहे, ही पक्षाची सर्वशक्तिमान संस्था आहे. त्याबद्दल प्रत्येकाचे आपापले तर्क-वितर्क आहेत. विरोधकांसह सर्वच पक्षांचे नेते गडकरींचा आदर करतात.

मोदी सरकारला घरचा आहेर :
भाजपच्या संसदीय समितीतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना वगळण्यात आलं. गडकरींना बाजूला करण्यावरून वेगवेगळ्या कारणांची चर्चा होत असतानाच रविवारी गडकरी त्यांच्या भाषणामुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरले. ‘NATCON 2022’च्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी एक विधान केलं. त्यावरून गडकरींनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारचेच कान टोचल्याचं बोललं जातंय. असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सच्या वतीने ‘NATCON 2022’चं आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी मोदी सरकारला घरचा आहेर दिलाय.

नितीन गडकरी काय म्हणाले :
‘NATCON 2022’च्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “बांधकाम क्षेत्रात वेळेला खूप महत्त्व आहे आणि वेळ हीच आपली खरी संपत्ती आहे. पण, सरकारची सर्वात मोठी समस्या आहे, ती म्हणजे सरकार वेळेवर निर्णय घेत नाही.

नितीन गडकरी पुढे बोलताना म्हणाले, “भारतात बांधकाम क्षेत्राचं भविष्य चांगलं आहे. त्यासाठी आपल्याला जगातील नवं तंत्रज्ञान आत्मसात करावं लागेल. आपल्याकडे बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या मालाला सुद्धा पर्याय शोधावे लागतील. जेणेकरून प्रकल्पाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता, किंमत कमी करत येईल”, असं नितीन गडकरींनी कार्यक्रमात बोलताना सांगितलं.

खरं सांगायचं तर आमच्याकडे पैशांची समस्या नाहीये. बँका वाटेल तेवढं कर्ज देण्यास तयार आहेत. प्रश्न मानसिकतेचा आहे. पैसा उभा राहतो. पैशांची अडचण येत नाही. प्रोजेक्ट आखले जातात. पण ते वेळेवर पूर्ण होत नाही, याची खंत वाटते. म्हणून माझं प्राधान्य हे प्रकल्पांच्या आखणीबरोबरच ते वेळेत कसे पूर्ण होतील, याकडे असतं”, असं नितीन गडकरी म्हणाले.

माझ्या खात्याबद्दल सांगायचं झालं, तर भारतभर धडाक्यात प्रोजेक्ट सुरु आहेत. अनेकानेक महत्वकांक्षी प्रोजेक्टवर काम सुरुये. सध्या टोलमधून वर्षाला ४० हजार कोटी आम्हाला उत्पन्न मिळतंय. २०२४ पर्यंत हेच उत्पन्न १ लाख ४० हजार कोटीच्या आसपास असेल. आता प्रकल्प उभारणीबरोबरच ते वेळेत कसे पूर्ण होतील, याकडे लक्ष द्यायला हवं”, असं नितीन गडकरी म्हणाले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Nitin Gadkari on Modi Government check details 22 August 2022.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x