17 March 2025 9:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Small Cap Fund l पैशाने पैसा वाढवा, 'ही' फंडाची योजना 5 पटीने पैसा वाढवतेय, फायदा घ्या TDS New Rules l पगारदारांनो, 1 एप्रिल 2025 पासून TDS चे नवे नियम लागू, टॅक्स डिडक्शनमध्ये असे बदल होणार Yes Bank Share Price | येस बँक गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, शेअर्स प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK Rattan Power Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ आला पेनी स्टॉक, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, शेअर प्राईस 42 रुपये, मिळेल 56% परतावा - NSE: IRB Horoscope Today | 18 मार्च 2025, कसा असेल तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस, तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 18 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

खासदार संजय राऊत यांना ईडीने घेतलं ताब्यात | ९ तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेण्यात आलं

Shivsena MP Sanjay Raut

MP Sanjay Raut | पत्रा चाळ प्रकरणात ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत यांना ताब्यात घेऊन दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात घेऊन जाणार असल्याची माहिती आहे. सकाळी सात वाजता संजय राऊतांच्या घरी पोहोचलेल्या ईडीच्या पथकाने ९ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेतलं आहे.

मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास ईडीकडून सुरू आहे. याच प्रकरणात आज सकाळी ईडीचं पथक शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी दाखल झालं. सकाळी ७ वाजेपासून ईडीच्या पथकाकडून संजय राऊतांची चौकशी सुरू होती.

ईडीचं पथक संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी दाखल झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरू झाली होती. त्याच दिशेने आता घडामोडी संजय राऊत यांच्या घरात घडताना दिसत आहे. सकाळी ७ वाजेपासून संजय राऊत यांच्या घरात तळ ठोकून असलेल्या ईडीच्या पथकाने ९ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत यांना आता ईडी कार्यालयात घेऊन जाण्यात येणार असल्याची माहिती असून, त्यानंतर पुढील कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena MP Sanjay Raut detained by ED in Patra Chawl land scam case money laundering probe check details 31 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena MP Sanjay Raut(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x