Inflation in India | काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांनाही दिल्ली पोलिसांनी काल ताब्यात घेतलं. महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधाता काँग्रेसने काल जोरदार आंदोलन केलं. काल मोठ्याप्रमाणावर देशव्यापी आंदोलन करण्यास सुरूवात झाली होती. देशभरात महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर आंदोलन जोर पकडत आहेत. त्यामुळे मोदी सरकारचं टेन्शन वाढल्याची चर्चा आहे. देशभरात वाढलेल्या महागाईमुळे जनतेमध्ये संताप असल्याचं स्पष्ट दिसत आहे. मात्र महागाई आणि बेरोजगारीचा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये म्हणून भाजपने पुन्हा धार्मिक मुद्दे पुढे रेटण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर नेटिझन्सनी भाजपाला झापताना आता हे असले राजकीय धंदे बस करा आणि आम्हाला सगळं कळून चुकलं आहे असं अनेकांनी अमित शहांच्या प्रतिक्रियेवर व्यक्त होताना म्हटले आहे.

अमित शहांनी धार्मिक कनेक्शन जोडलं :
काँग्रेसनं काळ्या कपड्यात दिल्लीत विरोध प्रदर्शन केलं. राहुल गांधी, प्रियंका गांधींसह काँग्रेसचे नेते काळे कपडे घालून रस्त्यावर उतरले होते. काँग्रेसचा हा विरोध पक्षाच्या नेत्यांविरोधात होत असलेल्या एजन्सीजच्या कारवाईवर होता. परंतु, अमित शहा यांनी या विरोध प्रदर्शनाला राम मंदिर निर्माणच्या तारखेशी जोडला. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर बांधकामाचे भूमिपूजन केलं.

यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा म्हणाले, काँग्रेस आंदोलनाच्या माध्यमातून आपला अजेंडा पूर्ण करत आहे. आज ईडीनं रेड टाकली नाही. काहीही झालं नाही, तरीही काँग्रेसनं विरोध केला. आज आंदोलन करण्याचं कारण काय, असं अमित शहा म्हणाले. आज काळ्या ड्रेसमध्ये काँग्रेसचे नेते दिसले. आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे वर्ष जुन्या राम मंदिराच्या बांधकामाचं भूमिपूजन केलं. राम मंदिराच्या बांधकामाला विरोध करत असल्याचा संदेश काँग्रेसनं या आंदोलनाच्या माध्यमातून दिल्याचं त्यांनी सांगितलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Union Home Minister Amit Shah reaction on congress protest against inflation check details 06 August 2022.

देशात महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात वातावरण तापताच अमित शहा यांनी राम मंदिराचा मुद्दा काढला | नेटिझन्स संतापले