नवी दिल्ली : सर्वात पहिल्यांदा ईमेल कधी वापरलं होतं? सर्वात पहिला ईमेलचा वापर कोणी केला होता? सध्या हे प्रश्न समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात विचारले जात आहे. प्रत्येकाला या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले की, १९८७-८८ च्या दरम्यान मी डिजिटल कॅमेरामध्ये पहिल्यांदा फोटो काढला. पंतप्रधान मोदींच्या या दाव्यावर समाज माध्यमांत लोक देखील हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक जण या दाव्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे.

फक्त नेटीझन्स नव्हे तर अनेक राजकीय पक्षदेखील या मुद्द्यावर जोरदार चर्चा करत आहेत. काँग्रेसच्या आयटी विभागाच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाची जोरदार खिल्ली उडवली आहे. दिव्या यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, कोणी अंदाज लावू शकतं का की १९८८ मध्ये नरेंद्र मोदी यांचा ईमेल आयडी काय असेल? मला वाटतं [email protected] हा त्यांचा ईमेल आयडी असू शकेल.

नेमकं मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय सांगितले?

भारतात डिजिटल कॅमेरा आला १९९० मध्ये व ई-मेलचा वापर १९९५; पण मोदींनी १९८८ मध्ये?