३ दिवसांत कोरोना रुग्ण बरा होणार, रामदेव बाबांच्या पतंजलीकडून औषध लाँच

नवी दिल्ली, 23 जून : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग हैराण आहे. भारतात या विषाणूची लागण होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशात बाबा रामदेव यांनी कोरोनावर पहिलं औषध शोधलं असल्याचा दावा केला आहे. आज ‘कोरोनिल’ हे कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी बनवलेले एक औषध त्यांनी लॉन्च केलं आहे. या विषाणूचा हरवण्यासाठी आयुर्वेदिक औषध प्रभावी आहे, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे.
आचार्य बालकृष्ण यांनी ट्विट केलेल्या ट्वीटनुसार, कोरोनावर आधारित पहिलं आयुर्वेदिक औषध मंगळवारी म्हणजेच आज लॉन्च केलं जाईल. हरिद्वारच्या पतंजली योगपीठात ही पत्रकार परिषद पार पडत आहे. पत्रकार परिषदेत बाबा रामदेव यांच्यासह आचार्य बालकृष्ण, औषधी चाचणीस उपस्थित असलेले वैज्ञानिक, संशोधक आणि डॉक्टरही उपस्थित आहेत. या आयुर्वेदिक औषधावर संशोधन पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी संयुक्तपणे केलं आहे.
Launch of first and foremost evidence-based ayurvedic medicine for Covid-19@yogrishiramdev @Ach_Balkrishna #Patanjali #आयुर्वेदविजय_कोरोनिल_श्वासारि pic.twitter.com/sjSWq5X0vS
— Patanjali Dairy (@PatanjaliDairy) June 23, 2020
सध्या जगभरात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत करोनावरील लस शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध शोधल्याचा तसंच ते प्रभावीदेखील ठरत असल्याचा दावा पतंजलीकडून करण्यात आला होता. पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी हे औषध तयार केलं आहे. तसंच आज लाँचदरम्यान बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण हे वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यातील निकाल सर्वांसमोर ठेवणार आहेत. सध्या या औषधाचं उत्पादन हरिद्वारमधील दिव्य फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड करत आहेत.
News English Summary: The growing outbreak of the corona virus has plagued the entire world. Now Baba Ramdev claims to have discovered the first drug on corona. Today, they have launched ‘Coronil’, a drug designed to treat the corona virus. Baba Ramdev claims that Ayurvedic medicine is effective in defeating this virus.
News English Title: Baba Ramdev claims to have discovered the first drug on corona. Today, they have launched Coronil News latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vedanta Share Price | 600 रुपये टार्गेट प्राईस, वेदांता शेअरमध्ये तेजीचे संकेत, सध्या 437 रुपयांवर ट्रेड करतोय - NSE: VEDL
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये तेजी, पण स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: RELIANCE
-
Vedanta Share Price | 560 रुपये टार्गेट प्राईस, प्रभुदास लिलाधर वेदांता शेअर्सवर बुलिश, संधी सोडू नका - NSE: VEDL
-
IREDA Share Price | टॉप ब्रोकरेज फर्मने दिले संकेत, शेअर प्राईस उसळी घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
-
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: IREDA
-
Suzlon Share Price | कंपनीला मिळाला नवीन कॉन्ट्रॅक्ट, सुझलॉन शेअर्स तेजीत, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Suzlon Share Price | स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले संकेत, BUY रेटिंग सह पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: SUZLON
-
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करतोय, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPC
-
TATA Motors Share Price | मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेजने दिले संकेत, अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | वेदांता शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL