19 April 2024 10:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

देशात अजून कोरोनाची तिसरी आणि चौथी लाट येण्याची शक्यता, सज्ज राहा - नितीन गडकरी

India corona pandemic

नागपूर, २९ एप्रिल | देशात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. संक्रमणामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा 1.5 कोटींच्या पार गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 78 हजारांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांचा आकडा पाहिला तर विक्रमी 2.70 लाख लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी मंगळवारी 2.62 लोक रिकव्हर झाले होते. ओव्हरऑल रिकव्हरी रेटमध्येही 1.8% ची वाढ झाली आहे. हा आता 82.08% झाला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने होरपळून निघत असतानाच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे. देशात तिसरी आणि चौथी लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी सज्ज राहा, असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं आहे.

नितीन गडकरी आज नागपुरात होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे आवाहन केलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आकडेवारी कमी होत असली तरी तिसरी- चौथी लाट येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने देखील आपल्याला आतापासून तयारी करणे आवश्यक आहे, असं गडकरींनी सांगितलं.

कोरोना विरुद्धची ही कठीण लढाई आपण लढत असताना एकमेकांना साह्य करून परिस्थितीला सामोरे गेलं पाहिजे. आपला आत्मविश्वास ढळू न देता अपुऱ्या साधन सामग्रीमध्ये काम करावं लागतं आहे. आपले डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकून काम करत आहे. त्यांना मी चरणस्पर्श करतो आणि त्यांच्या उपकारात आपण नेहमी राहू, असं ते म्हणाले.

 

News English Summary: Union Transport Minister Nitin Gadkari has made a big statement while the entire country, including Maharashtra, is fleeing with the second wave of corona. The third and fourth waves are expected in the country. Be ready for that, appealed Nitin Gadkari.

News English Title: Be ready for third and fourth wave of corona said union minister Nitin Gadkari news updates.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x