कोरोनाचे संकट संपताच महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल, कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले

बंगळुरू, ९ ऑगस्ट : आजच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. 4 दिवसांनंतर जैसलमेरमध्ये दाखल झालेले सीएम अशोक गेहलोत रविवारी म्हणाले की, भाजपाचे आमदार कुंपणावर जात आहेत, त्यांची आता पोलखोल झाली आहे. अशोक गहलोत म्हणाले की, भाजपा नेते आणि आमचा पक्ष सोडून गेलेल्या लोकांविरुद्ध प्रत्येक घरात संताप आहे. सोडून गेलेल्यांना देखील समजले आहे आणि त्यातील बहुतेक आमच्याकडे परत येतील. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही सरकारमधील लोक आहोत, घोडा बाजार होत होता. आमच्या आमदारांना आम्ही रोखलं. पण भाजपाचे आमदारांना कशाची चिंता आहे? तीन-चार ठिकाणी ते कुंपण घालत आहेत. तेही निवडकपणे. त्यांच्यात फूट पडली आहे.
तत्पूर्वी मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार पाडून भाजपाने सत्ता स्थापन केली, त्यानंतर राजस्थानमध्ये सध्या सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेस सरकारवर टांगती तलवार आहे. महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस सुरु असल्याची चर्चा आहे. अशातच राज्यात कोरोना संकट संपल्यानंतर भाजपचे सरकार अस्तित्वात येईल असा गौप्यस्फोट कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
महाराष्ट्रात ऑपरेशन कमळबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, त्यावर शशिकला जोल्ले म्हणाल्या की, सध्या कोरोनाचं संकट आहे, हे संकट दूर झाल्यावर राज्यात भाजपाचं सरकार निश्चित येईल. महाराष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर भाजपाचेच सरकार पाहिजे असं त्यांनी सांगितले. शिरोळ येथील भाजपा नेते अनिल यादव यांच्या निवासस्थानी कर्नाटकच्या महिला व बालविकास मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
मंत्री जोल्ले यांनी राज्यातील सरकारबाबत केलेल्या विधानामुळे राज्यात भाजपाचं ऑपरेशन लोटस पडद्यामागे सुरु असल्याचं दिसून येते. हे सरकार पाडण्याची भाजपाला गरज नाही, आमची लढाई कोरोनासोबत आहे, या परिस्थितीत सरकारचं अस्तित्व दिसत नाही, त्यामुळे सरकार पाडण्याचं आव्हान देण्याआधी सरकार चालवून दाखवावं असं प्रतिआव्हान देत सरकारमधील तिन्ही पक्षांचा एकमेकांशी संवाद नाही, त्यामुळे एकमेकांच्या भांडणातूनच हे सरकार स्वत:हून कोसळेल असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला होता.
News English Summary: There is talk of launching Operation Lotus in Maharashtra as well. Similarly, Karnataka Minister Shashikala Jolley has told reporters that the BJP government will come into existence after the end of the Corona crisis in the state.
News English Title: BJP government will come to Maharashtra as soon as the corona crisis ends said Karnataka Minister Shashikala Jolley News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL