25 June 2022 1:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
भाजपच्या सांगण्यावरून शिंदेंचा समर्थक आमदारांनाविरुद्धही गेम प्लॅन | सेनेतच असल्याचं सांगून भीषण प्लॅन रचला आहे Maharashtra Political Crisis | शिंदे गटातील 10 बंडखोर आमदार पवारांच्या संपर्कात | गुवाहाटीत धाकधूक वाढली MPSC Recruitment Updates | एमपीएससी अभ्यासक्रम बदलणार | मुख्य परीक्षेत मोठे बदल होणार SBI Share Price | एसबीआय शेअर 673 रुपयांच्या पार जाणार | तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला ठाण्याचा रिक्षाला आज करोडपती झालाय | त्यांच्या गावात गावकऱ्यांसाठी सोयी सुविधा नाहीत, पण स्वतःसाठी 2 हेलिपॅड 1 July Changes | 1 जुलैपासून तुमच्यावर थेट परिणाम करतील हे बदल | त्रास टाळण्यासाठी अधिक जाणून घ्या Hero Passion XTec | हिरोने लाँच केली नवी पॅशन एक्सटेक बाईक | जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
x

CAA कायदा: मोदीजी तुमच्या वडिलांचे आणि खानदानाचे जन्म दाखले हिंदुस्थानाला दाखवा

PM Narendra Modi, Bollywood Director Anurag Kashyap

मुंबईः नागरिकत्व दुरुस्ती कायदा संपूर्ण देशभरात लागू झाला असून, चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. अनुराग कश्यप यांनी सुरुवातीपासून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शवला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक ११ डिसेंबर रोजी संसदेत मंजूर करण्यात आले होते.

“आजपासून सीएए कायदा लागू झाला. मोदींना म्हणावं पहिले तुमचे कागदपत्र, entire political science ची पदवी दाखवा. तसेच वडिलांचे आणि खानदानाचे जन्म प्रमाणपत्र सगळ्या हिंदुस्थानाला दाखवा, नंतर आमच्याकडे मागणी करा”, अशी टीका अनुराग कश्यपने ट्विटरद्वारे केली आहे. एवढ्यावरच न थांबता अन्य एका ट्विटमध्ये, ‘मोदींनी शिक्षण घेतलंय हे सिद्ध करा’ असं आव्हानही त्यांनी दिलं आहे.

यापूर्वी देखील अनुराग कश्यप यांनी मोदींना लक्ष केलं आहे. त्यावेळी अनुराग कश्यपने नरेंद्र मोदींवर जहरी टीका करत ट्विट केलं होतं की, आमचे मुख्य सेवक, आमचे पंतप्रधान, जनतेचे मुख्य नोकर बहिरे व मुके आहेत आणि भावनांच्या पलिकडील आहेत. ते फक्त नौटंकी आहेत जे भाषण देऊ शकतात. बाकी सगळं त्यांच्या अवाक्याबाहेर आहे. त्यांना ना दिसत आहे नाही ऐकू येत आहे. आता ते नवीन नवीन खोटं शिकण्यात व्यग्र आहेत.

 

Web Title:  Bollywood Director Anurag Kashyap Demands Prime Minister Narendra Modi Fathers Birth Certificate.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1659)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x