11 July 2020 1:06 PM
अँप डाउनलोड

कलम ३७१ ला धक्का लावणार नाही: अमित शहा

Assam, Article 371, Special Status, NRC, Amit Shah

नवी दिल्ली: आसाममधील वैध नागरिकांची नॅशनल रजिस्टर फॉर सिटिझनशिपची (एनआरसी) प्रक्रिया ठरल्या वेळेनुसार पूर्ण झाल्याचे अमित शाह यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘एनआरसीवर अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पण, मी स्पष्ट शब्दांत सांगतो की एकाही अवैध नागरिकाला सरकार देशात राहून देणार नाही. हे आमचे वचन आहे.’

BhagyaVivah Marathi Matrimonial

यावेळी अमित शाह यांनी आसामला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७१ वरही भाष्य केले. कलम ३७१ ला संविधानात विशेष स्थान आहे आणि भाजपा सरकार त्याचा सन्मान करते. त्यामुळे यामध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत, असे अमित शाह यांनी सांगितले. ईशान्येतील राज्यांसाठीचा घटनेने दिलेला विशेष अधिकार कलम ३७१ला कोणत्याही परिस्थितीत हात लावला जाणार नाही, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले. गुवहाटी येथे ईशान्य राज्यासाठी आयोजित 68व्या परिषदेत ते बोलत होते. कलम ३७० ही तात्पुरती तरतूद होती. तर कलम ३७१ मधील विशेष तरतूदी या वेगळ्या आहेत. या दोन्ही गोष्टींमध्ये बरेच अंतर आहे, असे शहा म्हणाले.

जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७१मधील अधिकतर तरतूदी हटवल्यानंतर ईशान्येकडील नागरिकांना खोटी आणि भटकावणारी माहिती देण्याचा प्रयत्न केला गेला. पण केंद्र सरकार कधीही ३७१ कलम हटवणार नाही. यासंदर्भात मी संसदेत देखील स्पष्ट केल्याचे शहा यांनी सांगितले.आज ईशान्येकडील आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमोर मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की, केंद्र सरकार कलम ३७१ टच देखील करणार नाही.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Amit Shah(238)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x