8 August 2020 11:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अन्यथा सुशांतसिंह प्रकरणावरून राज्य सरकार बरखास्त होईल हे लक्षात ठेवा : आ. भातखळकर Corona Virus | आज राज्यात १२, ८२२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, २७५ रुग्णांचा मृत्यू अस्वच्छतेविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘भारत छोडो’चा नारा मराठा आरक्षण | मेटे धादांत खोटे बोलत असून ते फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिशाभूल करत आहेत मराठा समन्वय समितीवरून अशोक चव्हाणांना हटवा | मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याला विरोध विजयदुर्ग किल्ल्याची पडझड | खा. नारायण राणे यांनी पाहणी केली | केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार किराणा दुकानांवरील कर्मचारी आणि फेरीवाल्यांपासून कोरोना पसरण्याचा धोका अधिक - केंद्र सरकार
x

देश संकटात असताना मोदींचं स्वत:ची प्रतिमा बनवण्यावर १०० टक्के लक्ष केंद्रीत - राहुल गांधी

Congress leader Rahul Gandhi, Prime Minister Narendra Modi, 100 percent focused. building his own image

नवी दिल्ली, २३ जुलै : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी सध्या ‘सत्य का सफर: राहुल गांधी के साथ’ या व्हिडीओ सीरीजच्या माध्यमातून देशसमोरील प्रश्नांना वाचा फोडत आहेत. या सीरीजमधील तिसऱ्या व्हिडीओच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:ची प्रतिमा बनवण्यावर १०० टक्के लक्ष केंद्रीत केले आहे. भारतातल्या ताब्यात घेतलेल्या संस्था तेच काम करण्यामध्ये व्यस्त आहेत. एका माणसाची प्रतिमा राष्ट्रीय दृष्टीकोनाला पर्याय असू शकत नाही” असे राहुल गांधी यांनी टि्वट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. दोन मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये राहुल गांधी यांनी भारत-चीन संबंधांबद्दलही भाष्य केले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राहुल गांधी यांनी आज आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. “मजबूत स्थितीमध्ये राहून चीनशी चर्चा करत असाल, तरच तुम्ही त्यांच्याशी चर्चा करु शकता. चीनने जर तुमचा कमकुवतपणा पकडला, तर अडचण आहे. चीनचा विषय हाताळण्यासाठी तुमच्याकडे दृष्टीकोन असला पाहिजे. भारताला जागतिक दृष्टीकोनाची गरज आहे” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

“आपल्याला आपली पद्धत बदलावी लागेल, विचार बदलावा लागेल. मोठा आणि दीर्घकालीन विचार न केल्यामुळे आपण एक संधी गमावू शकतो. आपण आपसातच लढत आहोत. आपल्याकडे दृष्टीकोनही नाही हे यातून दिसत आहे. पंतप्रधानांना प्रश्न विचारणे, ही माझी जबाबदारी आहे. दृष्टीकोन देणे ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे. पण मी, तुम्हाला खात्रीने सांगतो, की पंतप्रधानांकडे दूरदृष्टी नाही. त्यामुळेच चीनने आपल्या हद्दीत घुसखोरी केली आहे” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Prime Minister Narendra Modi is 100 per cent focused on building his own image. The occupied institutions in India are engaged in the same work.

News English Summary: Congress leader Rahul Gandhi says Prime Minister Narendra Modi is 100 percent focused on building his own image News latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1260)#Rahul Gandhi(164)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x