2 May 2025 1:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा
x

देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचे आता पितळ उघडे पडले आहे | सोनिया गांधींचं टीकास्त्र

Sonia Gandhi, Arnab Goswami, TRP Scam whatsapp chat

नवी दिल्ली, २२ जानेवारी: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. हे संभाषण प्रसारमाध्यमे व समाज माध्यमावरही चर्चेत असून ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी आली असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

दरम्यान, अर्णव गोस्वामी आणि माजी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीदरम्यान सोनिया गांधी यांनी या प्रकरणावर भाष्य केले. देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचे आता पितळ उघडे पडले आहे, अशी घणाघाती टीका सोनिया गांधी यांनी उपस्थितांना संबोधित करताना केली.

तसेच आठवड्याभरात संसदेचं अधिवेशन सुरू होतंय. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. परंतु, जनहितार्थ असे अनेक मुद्दे आहेत ज्यांवर चर्चा होण्याची गरज आहे. पण सरकारची यासाठी सहमती आहे का? हेदेखील पाहावं लागेल’ असं म्हणत सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना तयारीचे आदेश दिले आहेत.

 

News English Summary: Congress president Sonia Gandhi has lashed out at the Center over the viral WhatsApp chat between Arnav Goswami and former official Partha Dasgupta. Sonia Gandhi commented on the issue during a meeting of the Congress Working Committee. Addressing the gathering, Sonia Gandhi said that the brass of those who felt the certificate of patriotism has now been exposed.

News English Title: Congress national president Sonia Gandhi slams Arnab Goswami over TRP Scam whatsapp chat leaked news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SoniaGandhi(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या