3 December 2024 6:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | आता प्रत्येक महिला व्याजाने कमवेल 30000; जाणून घ्या पोस्टाच्या योजनेची फायद्याची गोष्ट - Marathi News Mutual Fund SIP | पैशाचे पैसा वाढवा, बचत फक्त 167 रुपये, पण परतावा मिळेल 5 कोटी रुपये, जाणून घ्या अनोखा फंडा - Marathi News Waaree Renewables Share Price | 49,968% परतावा देणारा शेअर रॉकेट होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - SGX Nifty Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - SGX Nifty Vedanta Share Price | वेंदाता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, संधी सोडू नका - SGX Nifty Ola electric | ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत 30 टक्क्यांची मोठी घट; नेमकं कारण काय जाणून घ्या - Marathi News Home Loan | गृहकर्जावर बँक वसूलते एकूण 6 प्रकारचे चार्जेस; पहिल्यांदाच लोन घेणाऱ्यांना हे माहित असणे गरजेचे आहे
x

राजकीय विकृतीचा कळस | उत्तर प्रदेशात उद्धव ठाकरे आणि राऊतांवर पोस्टरबाजी

Controversial Poster, Flashed In Varanasi, Varstraharan, Uddhav Thackeray

वाराणसी, १० सप्टेंबर : कंगना रणौत आणि शिवसेना यांच्यात निर्माण झालेल्या वादावर शिवसेनेकडून आता पडदा टाकण्यात आला असला तरी याचे राजकीय पडसाद अद्याप उमटतच आहेत. अनेक भाजपशासित राज्यांमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष करण्यात आल्यानंतर आता उत्तर प्रदेशातूनही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना लक्ष करताना विकृतीचा कळस गाठला आहे.

या वादावर वाराणसीत एक पोस्टर झळकलं आहे. महाभारतातील ‘वस्त्रहरण’ प्रसंगावरील या पोस्टरमध्ये अभिनेत्री कंगना रणौतला द्रौपदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुश्यंत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृष्ण दाखवण्यात आलं आहे. वाराणसीतील स्थानिक वकील श्रीपती मिश्रा यांनी हे पोस्टर झळकवलं आहे. या पोस्टरबाबत सांगताना मिश्रा म्हणाले, “कंगना आणि शिवसेना वादामध्ये महाराष्ट्र शासन कौरव सेनेप्रमाणे वागत आहे. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीचं देशातील महिलांचा आत्मसन्मानाचं संरक्षण करु शकतात.” या वादावर शांत राहिल्याबद्दल त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही टीका केली आहे.

दरम्यान, शिवसेनेसोबत सुरु असलेल्या कंगना रणौतच्या वाकयुद्धानं आता राजकीय स्वरुप प्राप्त केलं असून कंगनाला भाजपाबरोबरच हिंदू साधूंची सर्वोच्च संस्था असलेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेनं पाठिंबा दर्शवला आहे. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना आखाडा परिषदेनं कंगनाला ‘शूर आणि धाडसी राष्ट्रकन्या’ असं संबोधलं आहे. भीतीपोटी महाराष्ट्र शासनानं कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केल्याचं आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी म्हटलं आहे. भाजपने संपूर्ण देशात उद्धव ठाकरे यांना विशेष लक्ष केलं असून सर्वकाही ठरवून आणि नियोजनबद्ध सुरु असल्याचा आरोप करण्यात येतं आहे. त्यामुळे शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देणार ते पाहावं लागणार आहे.

 

News English Summary: Posters depicting Bollywood actress Kangana Ranaut as ‘Draupadi’, a pivotal character in the Hindu mythology ‘Mahabharata’, were put up in Uttar Pradesh’s Varanasi on Thursday. The posters showed ‘cheerharan’ of Kangana by Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray, while Prime Minister Narendra Modi was depicted as Lord Krishna, protecting the national-winning actress.

News English Title: Controversial Poster On Kangana Shiv Sena Dispute Flashed In Varanasi The Use Of Varstraharan In The Mahabharata Marathi News LIVE latest updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x